विजेचा उच्चदाब; घरगुती उपकरणांची हानी
77316
विजेचा उच्चदाब; घरगुती उपकरणांची हानी
खारेपाटणमधील घटना; तातडीने भरपाई देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : खारेपाटण गावातील जैनवाडी, कपिलेश्वरवाडी, भैरीआळी आदी भागातील वीज ग्रहकांचा घरघुती वीजपुरवठ्यामध्ये अचानक उच्च विद्युत दाब निर्माण झाल्यामुळे येथील नागरिकांच्या घरातील दैनंदिन वापरातील विद्युत उपकरणांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. ही बाब गंभीर असून नुकसानग्रस्त ग्राहकांचे तातडीने पंचनामे करून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी खारेपाटण माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत यांनी केली. त्यांनी वीज मंडळाला तसे निवेदनही दिले.
श्री. राऊत यांनी याबाबत तातडीने खारेपाटण येथील विद्युत सहायक अभियंता खोत यांची कार्यालयात भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. ही घटना जुलैला दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली होती. अचानक वाढलेल्या अती उच्च विद्युत दाब प्रवाहामुळे घरातील केवळ विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. मात्र, यावेळी एखादी जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्नही श्री. राऊत यांनी केला. या घटनेत प्रमोद शांताराम मोहीरे, अरविंद दामोदर कर्ले, पार्श्व एचपीगॅस एजन्सी कार्यालय, मनोहर बंडू तेली, दीपक अंकुश शेट्ये, विजय जयराम देसाई, सुयोग सुरेश ब्रह्मदंडे, रवींद्र गणपत ब्रह्मदंडे, राकेश रमाकांत राऊत, श्रीकृष्ण शांताराम राऊत, संकेत सुरेश गुरव या ग्राहकांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले.
उच्च दाब नियंत्रित करणे ही महावितरण विभागाची जबाबदारी असून यामध्ये आमची काहीच चूक नसताना आम्हाला नाहक नुकसान सहन करावे लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. याबाबत श्री. राऊत यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता विद्युत निरीक्षक हे नुकसानीची पंचयादी घालण्यास उपलब्ध नसल्याचे समजते. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच वीज मंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. खारेपाटण येथील वीज ग्राहकांचे वीज मंडळाच्या बेपर्वाईमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई न दिल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्री. राऊत यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.