पाली शाळेतील तिघे गुणवत्ता यादीत

पाली शाळेतील तिघे गुणवत्ता यादीत

Published on

पाली शाळेतील
तिघे गुणवत्ता यादीत
पाली ः शिष्यवृत्ती परीक्षेत पाली विद्यामंदिरमधील दिक्षा महेंद्र मेस्त्रीने जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवे व रत्नागिरी तालुक्यात प्रथम स्थान पटकाविले. हर्ष महेश धाडवे हा जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वा तर रत्नागिरी तालुक्यात चौथ्या, सत्त्वशील सहदेव गुरव जिल्हा गुणवत्ता यादीत ११२ वा तर तालुक्यात ११ व्या क्रमांकावर आहे. एकाचवेळी ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तत्पूर्वी या तिघांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. त्यांना शिक्षक मारुती घोरपडे, मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग यांचे मार्गदर्शन लाभले.

दिगंबर तेंडुलकरांना
शिक्षक पुरस्कार
पाली ः लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल यांच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त प्राथमिक शाळा साठरे क्र. २ चे मुख्याध्यापक दिगंबर दत्तात्रय तेंडुलकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पाली येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष ॲड. अवधूत कळंबटे, संस्थापक अध्यक्ष ला. मनोजकुमार खानविलकर, सचिव प्रतिक कळंबटे, खजिनदार संकेत लकेश्री, गिरीश शितप, संदेश शिंदे, शिक्षिका स्नेहल तेंडुलकर, स्मिता पाटील यांसह शिक्षक उपस्थित होते.

नाणीज शाळेत
विद्यार्थी वस्तूभांडार
पाली ः विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यावसायिक शिक्षणाचे धडे मिळावेत, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणीज क्र. १ मध्ये विद्यार्थी वस्तूभांडार सुरू करण्यात आले आहे. याचे उद्‍घाटन नाणीज सरपंच विनायक शिवगण, माजी सरपंच दत्ताराम शिवगण, खानू केंद्राचे केंद्र प्रमुख गोविंद तारवे, पोलिसपाटील नितीन कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दत्ताराम खावडकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिलीप भागवत, निशा बेंडल, उपाध्यक्ष श्रीराम दाणी, अनिल खावडकर यासह पालक उपस्थित होते.

लोकमान्य वाचनालयातर्फे
खुली लेख स्पर्धा
साडवली ः देवरूख येथील सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांचे स्मृती प्रित्यर्थ खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी होय, माझी मराठी, समृद्ध मराठी, मराठी भाषा आणि परप्रांतीय
हे दोन विषय देण्यात आले आहेत. लेख पाठविण्याची मुदत २० ऑगस्ट २०२५ आहे. विजेत्यांना रोख रक्कम, ग्रंथभेट व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेचे लेख वाचनालयाच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळी वाचनालयात आणून द्यावेत किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवावेत. तसेच लेख वाचनालयाच्या ta६४०९००१@gmail.com या ईमेलवरही पाठवता येतील. स्पर्धेविषयीच्या माहितीसाठी वाचनालयाचे अध्यक्ष जी. के. जोशी यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com