जिल्हापरीषद शाळेचे विद्यार्थी लय भारी

जिल्हापरीषद शाळेचे विद्यार्थी लय भारी

Published on

शिष्यवृत्ती परीक्षा.........लोगो

जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी लय भारी...!
१४० विद्यार्थी चमकले; चार वर्षांत चढता आलेख
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः खासगी आणि इंग्रजी शाळांच्या तुलनेत भौतिक सुविधांची वानवा असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळांनी नुकत्याच झालेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत सुमारे १४० विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. मागील चार वर्षांत जिल्हा परिषद प्रशासनाने शिष्यवृत्तीसह स्पर्धा परीक्षांची तयारी शालेयस्तरावर करवून घेण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे. त्याद्वारे वर्षभर नियोजन केले जातात. त्याचा फायदा यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत झाला आहे.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा ८ हजार २८० विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी सुमारे २ हजार २२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या काही वर्षांची स्थिती पाहता जि. प.च्या विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळा असून सुमारे ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील दहा वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातही खासगी शाळांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातही ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढलेल्या आहेत. त्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद मराठी शाळा टिकण्यासाठी विविध उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतले आहेत. त्याद्वारे गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दापोली तालुक्याने यामध्ये बाजी मारली आहे. शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेत या विद्यार्थ्यांचा टक्का वाढलेला आहे. चार वर्षांपूर्वी गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली. त्या अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेण्यात येते. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेला जे विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे चाचणी परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदा १४० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव या अधिकाऱ्यांनीही सुयोग्य नियोजन करीत वर्षाचे वेळापत्रक निश्चित केले होते.

चौकट १
संगमेश्वर तालुका आघाडीवर
गुणवत्ता कक्षामुळे विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांत फायदा होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत २०२० मध्ये अवघी ३७ मुले झळकली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ५६, २०२२ मध्ये ८९ तर २०२३ मध्ये १३०, २०२४ मध्ये १३४ विद्यार्थी २०२५ मध्ये १४० झळकले आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुका आघाडीवर असून ४२ मुले गुणवत्ता यादीत आहेत. त्यापाठोपाठ राजापूर तालुक्याचा समावेश आहे.

चौकट २
गुणवत्ता यादीत चमकलेले तालुकानिहाय विद्यार्थी
ग्राफ - 77338
तालुका विद्यार्थी
*चिपळूण ३
* दापोली १७
* गुहागर ३
* खेड १९
* लांजा १४
* मंडणगड १
* राजापूर २९
* रत्नागिरी १२
* संगमेश्वर ४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com