रत्नागिरीः क्राइम बातम्या
मारहाण प्रकरणी
दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : किरकोळ कारणातून तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. शहर पोलिसांत दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कय्युम मुबारक खान (वय २६) व मारुफ फारुख खान (वय २५, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी चारच्या सुमारास जे. के. फाईल्स कंपनीसमोर रमाकांत शर्मा यांच्या साईटवर घडली.
फिर्यादी सिध्देश रमेश यादव (२३, रा. शांतीनगर-रसाळवाडी, रत्नागिरी) हा त्याचा मित्र इम्रान सय्यद याची लादी बसवण्याच्या कामासाठी मजूर आणण्याकरिता इम्रान सय्यद व राज घोरपडे या दोघांसह रमाकांत यांच्या साईटवर गेला होता. तेथील बांधकामाच्या वरच्या मजल्यावर ते गेले असता त्यांना त्याठिकाणी मारुफ खान दिसून आला. त्याला फिर्यादीने तुझे इथे काय काम आहे, असे विचारले. त्यावर त्याने माझे लादी बसवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर तो फिर्यादी आणि त्याच्या मित्रांकडे रागाने बघू लागला तेव्हा फिर्यादीने त्याला काय बघतोस, असे विचारले असता त्याने त्यांना शिवीगाळ केली.
---------------
भाट्ये समुद्रकिनारी
गाडी वाळूत रुतली
रत्नागिरी : शहरातील भाट्ये समुद्रकिनारी गाडी चालवून मज्जामस्ती करताना गाडी वाळून रुतली. यातून मित्रांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी शहर पोलिसांत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भूषण गजानन भेलेकर (वय २०, रा. मालेगाव, जि. नाशिक) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाटे समुद्रकिनारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे भाट्ये चेकपोस्ट येथे कर्तव्य बजावत असताना स्थानिक नागरिकांनी एक काळ्या रंगाची मोटार (एमएच ०४ सीएक्स ८२६२) भाट्ये समुद्रकिनारी फेऱ्या मारीत असल्याचे कळविले. माहिती मिळताच फिर्यादी संग्राम झांबरे व पोलिस कॉन्स्टेबल पाटील हे घटनास्थळी गेले. त्यावेळी मोटार वाळूमध्ये व पाण्यामध्ये चालविली. त्यामुळे ती वाळूमध्ये रुतली.
-----------
वाहतुकीस अडथळा करणाऱ्या
दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा ते पेठकिल्ला जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहतुकीस अडथळा होईल, असे पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विशाल दीपक जाधव (वय २७, रा. राजयोग विहार, ए विंग, नाचणे-रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ११) रात्री साडेसातच्या सुमारास मिरकरवाडा ते पेठकिल्ला जाणाऱ्या रस्त्यावर राजेश पानशॉप येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विशाल जाधव याने दुचाकी (एमएच १० डीएस ४६७६) ही वाहतुकीस अडथळा होईल, अशी पार्क केली. याप्रकरणी महिला पोलिस हवालदार सोनल शिवलकर यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरूरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
----------
सार्वजनिक ठिकाणी
मद्यपान प्रकरणी गुन्हा
रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. संकेत पद्माकर वाघधरे (वय ३२, रा. जयगड, सडेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जयगड ते किल्ला जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे मद्यपरवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याच्या उद्देशाने हातात मद्याची विदेशी बाटली घेऊन असलेल्या स्थितीत सापडला. याप्रकरणी पोलिस शिपाई पवन पांगरीकर यांनी जयगड पोलिसांत तक्रार दिली.
.....
रस्त्यावर वाहन पार्क
प्रकरणी गुन्हा दाखल
पावस : पावस ते गोळप जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी वाहतुकीस अडथळा होईल, असे पार्क करणाऱ्या स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मुकेश सुरेंद्र लोधी (वय २१, रा. एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयितांचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १२) दुपारी चारच्या सुमारास पावस ते गोळप जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मुकेश लोधी यांनी दुचाकी (एमएच ०८ एसी ४६४१) ही वाहतुकीस अडथळा व धोका होईल, अशा स्थितीत लावून ठेवली. याप्रकरणी सहायक पोलिस फौजदार संजय शिवगण यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांत तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.