सिद्धेश बारजे, प्रियांका ओकसा ठरल्या अव्वल

सिद्धेश बारजे, प्रियांका ओकसा ठरल्या अव्वल

Published on

77337

सिद्धेश बारजे, प्रियांका ओकसा ठरल्या अव्वल

कुडाळातील हाफ मॅरेथॉन; विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः राणे हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च सेंटर कुडाळ आयोजित ‘कुडाळ मॉन्सून रन २०२५’ या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर खुल्या पुरूष गटात सिद्धेश बारजे (रत्नागिरी) तर महिला गटात प्रियांका ओकसा (नाशिक) विजेती ठरली. स्पर्धेच्या उद्‍घाटनला जिल्हाधिकारी अनिल पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी उपस्थिती दर्शवून ५ किलोमीटरमध्ये सहभाग घेतला.

मॅरेथॉनचे सहप्रायोजक रोटरी क्लब ऑफ कुडाळ, कुडाळ सायकल क्लब, सायक्लीस्ट असोसीएशन सिंधुदुर्ग, आयएमए, सखी सोबती मित्रमंडळ पिंगुळी, रांगणा रागिनी रनर्स आदींचा समावेश होता. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई, माजी आमदार वैभव नाईक, नगरसेविका सौ. संध्या तेर्से, अमरसेन सावंत, राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळचे डॉ जी. टी. राणे, अजित राणे, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, कुडाळ एमआयडीसी असोसीएशन अध्यक्ष मोहन होडावडेकर, कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, गजानन कांदळगावकर, डॉ. संजय निगुडकर, एमआयडी अधिकारी अविनाश रेवंडकर, राकेश म्हाडदळकर, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, डॉ. प्रशांत मडव, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. जयसिंग रावराणे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर, डॉ. सई राणे, अमित तेंडोलकर, डॉ. प्रणव प्रभू, भूषण तेजम, अजिंक्य जामसंडेकर, प्रमोद भोगटे, डॉ. शंतनू तेंडोलकर, राज वारंग, अभय सामंत, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, भविष्यात ही मॅरेथॉन देशातील सर्वोत्तम ठरेल, असे गौरवोद्गार आर्यनमॅन अरविंद सावंत यांनी काढले. सचिन मदने यांनी सूत्रसंचालन केले.

निकाल असा ः २१ किलोमीटर खुला पुरूष ः द्वितीय विशाल कांबरे (कराड सातारा), महिला ः द्वितीय विशाखा शिंदे (नाशिक). २१ किलोमीटर ४५ ते ५५ वयोगट पुरूष ः प्रथम अरविंद सावंत (मुंबई), द्वितीय संतोष साळगावकर (कुडाळ), महिला ः प्रथम अनिता पाटील (रत्नागिरी), द्वितीय प्रियशी चारी (गोवा). २१ किलोमीटर ५५ ते ६५ वयोगट ः पुरूष प्रथम विश्वनाथ शेटये (गोवा), द्वितीय डॉ. शंतनू तेंडुलकर (सावंतवाडी), महिला ः प्रथम सुजाता रासकर (कुडाळ), द्वितीय वर्षा आंबेरकर (कणकवली). २१ किलोमीटर ६५ च्यावर वयोगट पुरूष ः प्रथम महिपती संकपाळ (कोल्हापूर), सिताराम उटेकर (मुंबई). १६ किलोमीटर खुलागट पुरूष ः प्रथम निलेश अरसकर (मुंबई), द्वितीय शिवम घोगळे (वेंगुर्ला), महिला ः प्रथम प्रतिक्षा चोरामले (मुंबई), द्वितीय दर्शना भिसे (मालवण). १६ किलोमीटर ४५ ते ५५ वयोगट पुरूष ः प्रथम हरिश कामत( गोवा), द्वितीय डॉ. विकास कोवरी (वेंगुर्ला), महिला ः प्रथम सुप्रिया मडव (कुडाळ), द्वितीय डॉ. पुष्पा (मालवण). १६ किलोमीटर ५५ ते ६५ वयोगट पुरूष ः प्रथम प्रविण कुलकर्णी (देवगड), द्वितीय प्रदिप वेंगुर्लेकर (वेंगुर्ला), महिला ः प्रथम अमृता वेजरे (देवगड). १६ किलोमीटर ६५ वरील वयोगट पुरूष ः प्रथम सतिश दिपनाईक (मुंबई), द्वितीय कुमार व्यंकटरमन (मुंबई). १० किलोमीटर खुलागट पुरूष ः प्रथम हितेश शिंदे (मुंबई), द्वितीय ओमकार बाईकर (रत्नागिरी), महिला ः प्रथम साक्षी बोराडे (नाशिक), द्वितीय मानसी मराठे( रत्नागिरी), १० किलोमीटर ४५ ते ५५ वयोगट पुरूष ः प्रथम अनंत तानकर (गुहागर), द्वितीय प्रविण कुमार (गोवा), महिला ः प्रथम प्रितीवा लोगो (गोवा), द्वितीय केतकी लेले (रत्नागिरी). १० किलोमीटर ५५ ते ६५ वयोगट पुरूष ः प्रथम यशवंत परब (पणजी गोवा), द्वितीय नितीन सामंत (रत्नागिरी), महिला ः प्रथम शृती कोठारे (गोवा), द्वितीय अर्चना गोरे( कुडाळ). १० किलोमीटर ६५ वरील वयोगट पुरूष ः प्रथम बजरंग चव्हाण (कोल्हापूर), द्वितीय अविनाश फडके (रत्नागिरी), महिला ः प्रथम सुषमा परूळेकर (मुंबई), द्वितीय अरूणा सामंत (रत्नागिरी).
----------------
ब्रॅण्ड अम्बॅसिटर्सचा सत्कार
अरविंद सावंत, डॉ. तेजानंद गणपत्ये, प्रसाद कोरगावकर, ओमकार पराडकर, धनंजय पाध्ये, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, डॉ. शंतनू तेंडुलकर, जयवंत शिवदे, डॉ. प्रल्हाद मणचेकर, आशिष पावसकर, डॉ. स्वप्निल दाभोलकर, डॉ. नितीन संगर, तेजस मुणगेकर, डॉ. अंजना काजरेकर, डॉ. संजय देसाई, डॉ. राहुल वझे, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. स्नेहल गोवेकर, सोनल पालव, सुप्रिया मडव, शुभांगी जोशी, शिवम घोगळे, डॉ. शिल्पा दातेकाळे, मिलींद खानोलकर आदींचा ब्रॅण्ड अम्बॅसिटर म्हणून विशेष सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com