रोटरीचा पदग्रहण सोहळा उद्या चिपळूणात
- ratchl१४६.jpg-
२५N७७४३१
सुनील रेडीज
- ratchl१४४.jpg-
२५N७७४२९
अभिजित चव्हाण
- ratchl१४५.jpg-
२५N७७४३०
रोहन देवकर
----
रोटरीचा पदग्रहण सोहळा उद्या चिपळुणात
अध्यक्षपदी सुनील रेडीज; सामाजिक बदल घडवणारे उपक्रम राबवणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः येथील रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवारी (ता. १६) सायंकाळी ७ वाजता राधाताई लाड सभागृहात होणार आहे. २०२५-२६ या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी सुनील रेडीज, सचिवपदी अभिजित चव्हाण तर खजिनदारपदी रोहन देवकर यांची निवड करण्यात आली आहे.
रोटरीच्या या सोहळ्याला लेनी दी कोस्टा, अजय मेमन, अभिजित वाळके आणि प्रसाद सागवेकर हे उपस्थित राहणार आहेत. नवीन अध्यक्ष रेडीज हे गेल्या ११ वर्षांपासून रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांत सक्रिय असून, इलेक्ट्रिकल ठेकेदार म्हणून कार्यरत आहेत. समाजसेवा, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. ते चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, मुरलीधर देवस्थानचे खजिनदार आणि जिल्हा ग्राहक संघटनेचे अशासकीय सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. सचिव चव्हाण हे २०१७ पासून रोटरी क्लबशी जोडले गेले. ''सिग्नेचर हॉलिडेज'' या नावाने पर्यटन व्यवसायात त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. ‘वीणा वर्ल्ड’ या नामांकित संस्थेचे चिपळूणमधील ते गेली ११ वर्षे सेल्स पार्टनर आहेत. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य क्लबच्या उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. खजिनदारपदी निवडले गेलेले देवकर हे क्लबमध्ये ११ वर्षांपासून सक्रिय असून, लिकर मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायात कार्यरत आहेत. सामाजिक उपक्रमात त्यांचा नियमित सहभाग असतो. रोटरी क्लब चिपळूणने आतापर्यंत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. नव्या कार्यकारिणीतून नवकल्पना आणि सामाजिक बदल घडवणारे उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मावळते अध्यक्ष अविनाश पालशेतकर, सचिव राजेश ओतारी आणि खजिनदार स्वप्नील चिले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.