देवगडात रस्त्यालगतची झाडी तोडण्याची मागणी

देवगडात रस्त्यालगतची झाडी तोडण्याची मागणी

Published on

swt1416.jpg
77441
देवगड ः ग्रामीण भागांत रस्त्यानजीक वाढलेली झाडी धोकादायक ठरत आहे.

देवगडात रस्त्यालगतची
झाडी तोडण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ ः तालुक्याच्या ग्रामीण भागांतील विविध रस्त्यांलगत पावसामुळे झाडी वाढली आहे. गवतही वाढले असल्यामुळे वाहने हाकताना अडचणीचे होत असल्याचे सांगितले जात आहे. आता गणेशोत्सव जवळ येत असल्याने रस्त्याकडेची झाडी तोडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने ग्रामीण भागांत रस्त्याकडेला मोठी झाडी वाढली आहे.
मेच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्याने गवत आता बऱ्यापैकी मोठे वाढले आहे. रस्त्याकडेला रानही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच गेले काही दिवस कडक ऊन पडत असल्याने रान चांगलेच फोफावले आहे. त्यामुळे वाहन चालविताना काळजी घ्यावी लागत आहे. रस्त्याकडेला रानटी झुडपे, वेली वाढलेल्या असल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालविताना काळजी घ्यावी लागते.
काहीवेळा गुरे तसेच सरपटणारी जनावरे रस्त्यावर येत असल्याने सावधानता बाळगावी लागत आहे. रस्त्याकडेला गवत वाढलेले असल्याने समोरच्या वाहनांना बाजू देताना रस्त्याचा पटकन अंदाज येत नाही. अशावेळी अपघात होण्याचाही संभव असतो. आता गणेशोत्सवात चाकरमानी वाहने घेऊन गावी आल्यावर वाहनांच्या वर्दळीत मोठी वाढ होऊ शकते. अशावेळी रस्त्याकडेची झाडी कमी करण्याची आवश्यकता बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com