रत्नागिरीत 46 ग्रामपंचायतींवर महिलाराज
-rat१४p१७.jpg-
२५N७७४५१
रत्नागिरी ः अल्पबचत सभागृहात सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढताना मुलगी मार्वी चव्हाण. सोबत तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी.
------
रत्नागिरीत ४७ ग्रामपंचायतींवर महिलाराज
सरपंच आरक्षण; ३१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : रत्नागिरी तालुक्यातील सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण आज जाहीर झाले. तालुक्यातील एकूण ९४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिलाराज निश्चित झाले आहे. तालुक्यात ३१ जागांवर सर्वसाधारण म्हणजेच खुल्या गटातील उमेदवारांना संधी मिळणार असल्याने तिथे इच्छुकांची भाऊगर्दी राहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया झाली. २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हे आरक्षण राहणार आहे. मार्वी चव्हाण या मुलीने चिठ्ठ्या उचलल्या. सकाळी ११ वाजता सोडत सुरू झाली. यामध्ये एकूण ९४ ग्रामपंचायतींच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आहेत. तालुक्यात राजकीय स्थित्यंतर लक्षात घेता सर्वाधिक चुरस ही रत्नागिरी शहराजवळील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी ३१ तर फक्त सर्वसाधारणसाठी ३२ जागांवर लढत पाहायला मिळणार आहे.
चौकट
प्रवर्गनिहाय आरक्षण
* अनुसूचित जाती स्त्री प्रवर्ग ः कशेळी, वाटद
* अनुसूचित जाती ः धामणसे, हरचिरी, करबुडे
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री प्रवर्ग) ः गावडे आंबेरे, पाली, खरवते, रिळ, कापडगाव, हातखंबा, पोमेंडीखुर्द, साखरमोहल्ला, मिऱ्या, कोळंबे, जयगड, खालगाव, दांडेआडोम.
* नागरिकांचा मागास प्रवर्ग ः मेर्वी, कळझोंडी, निवळी, उक्षी, पावस, चाफे, भाट्ये, चरवेली, नाखरे, आगरनरळ, मावळंगे, शिवरगाव, पानवल.
* सर्वसाधारण (स्त्री प्रवर्ग)ः काळबादेवी, देऊड, चांदेराई, तरवळ, शिवार आंबेरे, विल्ये, नाचणे नाणीज, बोंडे, टेंभे, टिके, सतकोंडी, वळके वेतोशी, वरवडे, गावखडी, खेडशी, मिरजोळे, खानू, कोतवडे, गडनरळ, मजगाव, लाजुळ, सैतावडे, फणसवळे, नेवरे, डोर्ले, पिरंदवणे, जांभरुण, जांभरी, चवे, चाफेरी.
* सर्वसाधारण (खुला गट)ः सडामिऱ्या, राई, गणपतीपुळे, गुंबद, चांदोर, निवेंडी, करबुडे, नेरूळ, बसणी, साठर, मालगुंड, कुवारबाव, वेळवंड, कासारवेली, तोणदे, सोमेश्वर, केळ्ये, गणेशगुळे, पूर्णगड, कासारी, फणसोप, चिंद्रवली, झरेवाडी, रानपाट, भगवती नगर, ओरी, भोके, गोळप, नांदिवडे, पोमेंडीबुद्रुक, कर्ला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.