''जैसे थे'' ने इच्छुकांचा पुन्हा हिरमोड

''जैसे थे'' ने इच्छुकांचा पुन्हा हिरमोड

Published on

-Rat१४p१०.jpg-
२५N७७४२३
मंडणगड ः आरक्षण सोडतीनंतर नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन करताना तहसीलदार अक्षय ढाकणे.
---
‘जैसे थे’ ने इच्छुकांचा पुन्हा हिरमोड
मंडणगड तालुका ; ४९ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः न्यायालयाच्या आदेशामुळे अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण प्रक्रिया नव्याने राबवण्यात आली. त्यामुळे आधीच्या आरक्षणात फेरबदल होईल, अशी अपेक्षा घेऊन आलेल्या इच्छुकांचा आरक्षण जैसे थे राहिल्याने हिरमोड झाला. देव्हारे व अडखळ या ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता सर्वच ग्रामपंचायतींचे आरक्षण दोन महिन्यापूर्वीच्या सोडतीप्रमाणे कायम राहिले.
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी एक ग्रामपंचायत आरक्षित झाली. अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलांसाठी एक आणि सर्वसाधारणसाठी ३ ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १३ ग्रामपंचायती राखीव होत्या. त्यातील सहा ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव आहेत तर सात ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण हे आरक्षण पडले. खुल्या प्रवर्गासाठी ३१ ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या आहेत. त्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण महिला राखीव हे आरक्षण आहे.
या वेळी गटविकास अधिकारी सुनील खरात, निवासी नायब तहसीलदार संजय गुरव, महसूल साहाय्यक अधिकारी सचिन गोवळकर, मंडळ अधिकारी मनोहर पवार, अमित शिगवण, नीलेश गोडघासे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते. आरक्षण सोडतीसाठी १९९५ पासूनचे ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण व २०११चे लोकसंख्येच्या प्रमाणातील नमूद प्रवर्गाची टक्केवारी लक्षात घेण्यात आली.

चौकट
प्रवर्गनिहाय आरक्षण
* अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला राखीव- कादवण
* अनुसूचित जमाती प्रवर्ग - तिडे, तळेघर व घोसाळे
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव) - बाणकोट, भोळवली, दाभट, जावळे, पाट, विन्हे, तुळशी.
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) - भिंगळोली, लाटवण, मुरादपूर, उमरोली, वाल्मिकीनगर, लोकरवण.
* खुला प्रवर्ग (महिला राखीव) - दुधेरे, बामणघऱ, कुडुकखुर्द, माहू-बोरघर, पणदेरी, पालघर, पालवणी, पिंपळगाव, पाले, शिरगाव, सावरी, तोंडली, उन्हवरे, उंबरशेत, वेळास, वलौते, अडखळ.
* खुला प्रवर्ग ः घराडी बहिरवली, कुंबळे, म्हाप्रळ, वेसवी, चिंचघर, कोंडगाव, निगडी, पेवे, पिंपळोली, पडवे, शिगवण, सडे, देव्हारे, गोठे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com