विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता उद्योजक बनावे

विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता उद्योजक बनावे

Published on

kan144 .jpg
77487
आशियेः येथील ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
-----------

विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता उद्योजक बनावे
डॉ. बाळकृष्ण गावडेः आशिये ग्रामपंचायतीच्या वतीने दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार
कणकवली, ता. १४ः देशात मोदी सरकार येण्यापूर्वी कुठलीही वस्तु घेतली तर मेड इन जपान, मेड इन चायना, मेड इन युएसए यासह अन्य देशांच्या वस्तु आपल्या घरात येत होत्या. परंतु, आपण स्वयंपूर्ण बनलं पाहिजे आणि हे आपण तयार केलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यात स्पर्धात्मक परिक्षा अकॅडमी फार कमी आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक परिक्षांमध्ये विद्यार्थी टिकताना दिसत नाहीत. मुलांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या मातीत पिकणाऱ्या आणि उगवणाऱ्या फळपिकांचे मार्केटिंग करुन स्वतःच उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन वनश्री पुरस्कार विजेते डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी केले.
आशिये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांच्या संकल्पनेतुन गावातील दहावी, बारावी गुणवंताचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठार माजी सभापती दिलीप तळेकर, सरपंच महेश गुरव, अमोल खानोलकर, उपसरपंच संदीप जाधव, मालवणी कवी विलास खानोलकर, भगवान लोके, सदानंद बाणे, शंकर गुरव, सुहास गुरव, मानसी बाणे, विशाखा गुरव, संजना ठाकूर, ग्रामसेवक राकेश गोळवणकर, प्रवीण ठाकूर, निलेश ठाकूर, संजय बाणे, सुनील बाणे, दिवाकर बाणे आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
डॉ. गावडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी दहावी बारावी झाल्यानंतर तुम्हाला आयटीआयमध्ये विभाग आहेत. आज त्या विभागात असलेली मुलं फार कमी आहेत. आपल्याला जर स्पर्धेत उतरायचे असेल तर स्वतः चांगला अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रवेश परिक्षा देताना अनेक अडचणी येत आहेत. आता कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेताना चांगली टक्केवारी आवश्यक आहे. सध्या सायन्स शाखेत प्रवेश मिळविताना खूप धडपड करावी लागत आहे.यासाठी गुणांची टक्केवारी वाढवली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षणाची अनेक कवाडे खुली झाली आहेत. प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी नवीन शैक्षणिक धोरणाने दिली आहे. त्याचा मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
श्री. तळेकर म्हणाले, आपले पालक मोल मजूरी करून कष्ट करून आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत. भले आपल्या पोटाला चिमटे काढून पालक राहत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण घेण्यासाठी न भरकटता प्रामाणिक अभ्यास करावा, मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे.
महेश गुरव म्हणाले, आशिये ग्रामपंचायतच्यावतीने दहावी , बारावीतील गुणवंतांच्या सत्कारामागे एकच उद्देश आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपला गाव उभा आहे. याची जाण असावी. विद्यार्थ्यांच्या जीवनात एक प्रेरणा देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. सुत्रसंचालन निकिता ठाकूर, तर आभार ग्रामसेवक राकेश गोळवणकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com