राजापुरात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

राजापुरात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

Published on

-rat१४p१९.jpg-
२५N७७४९१
राजापूर ः सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढताना विद्यार्थी. शेजारी तहसीलदार विकास गंबरे आणि अधिकारी.
----
राजापुरात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
महिलांना ५१ जागी संधी ; इच्छुकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. त्यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणानुसार सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३५, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी १४ आणि दोन ग्रामपंचायती अनुसूचित जातीजमाती असे १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले.
सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीला तहसीलदार विकास गंबरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सरपंचपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार उपस्थित होते. एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सलग दोन-तीन टर्म एकच आरक्षण राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत मंदार सप्रे, संजय सुतार यांनी आरक्षण सोडतीच्या प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या वेळी तहसीलदार गंबरे यांनी योग्य पद्धतीने आरक्षण सोडत प्रक्रिया राबवली जात असल्याचे स्पष्ट केले.
---
चौकट
सरपंच आरक्षण
* नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ः आजिवली, दसूर, हसोळतर्फे सौंदळ, चुनाकोळवण, जैतापूर, तळगाव, आडवली, नाटे, कोतापूर, हातिवले, आंगले, ताम्हाणे, वाटूळ, झर्ये.
* नागरिकांचा मागास प्रवर्ग- ओशिवळे, उपळे, धाऊलवल्ली, मंदरूळ, डोंगर, वाल्ये, कोंडयेतर्फे सौंदळ, येळवण, मोरोशी, पांगरे बु., सोलगाव, साखरीनाटे, सागवे.
* सर्वसाधारण स्त्री- ओझर, हातदे, जुवाठी, राजवाडी, शेढे, भालावली, हरळ, कोदवली, रायपाटण, तुळसवडे, दळे, करक, मोसम, सौंदळ, वडदहसोळ, देवीहसोळ, कारवली, माडबन, ससाळे, खडीकोळवण, धोपेश्वर, अणसुरे, पाचल खरवते, खिणगिणी, गोवळ, कशेळी, पांगरेखुर्द, महाळुंगे, कोंडयेतर्फे राजापूर, गोठणे दोनिवडे, कुवेशी, प्रिंदावण, शिवणेखुर्द, तेरवण.
* सर्वसाधारण- आंबोळगड, कोंडसर बुद्रुक, परटवली, वडवली, ओणी, मिठगवाणे, पेंडखळे, कणेरी, भू, मूर, तळवडे मोगरे, चिखलगांव, मिळंद, तारळ, काजिर्डा, देवाचे गोठणे, नाणार, वाडापेठ, कोळंब, दोनिवडे, निवेली, विल्ये, साखर, जुवे जैतापूर, पडवे, येरडव, शीळ, जवळेथर, परूळे, फुफेरे, शेजवली, कुंभवडे, पन्हळेतर्फे सौंदळ, उन्हाळे, कोंडीवळे.
अनुसुचित जाती (महिला) ः कळसवली, अनुसुचित जाती - केळवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com