खुल्या गटातील जागांवर उमेदवारांची चुरस
खुल्या गटातील जागांवर उमेदवारांची चुरस
संगमेश्वर तालुका ; १२७ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः तालुक्यातील १२७ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत सुरळीत झाली. यामध्ये ४३ ग्रामपंचायतींत सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस राहणार आहे.
येथील तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणसाठी ३ व महिलांसाठी ३ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग १५ व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीवसाठी १७ जागा, सर्वसाधारणसाठी ४३ तर सर्वसाधारण स्त्री राखीवसाठी ४४ या जागांवर आरक्षण सोडत झाली. पूरक आरक्षण आले तर सरपंचपदावरील मार्ग मोकळा होईल, अशा आशेने असलेल्या अनेकांच्या इच्छांवर पाणी फेरले आहे. मागीलवेळी झालेल्या सोडतीच्या तुलनेत तालुक्यात काही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण बदलल्यामुळे इच्छुकांची अडचण झाली आहे; मात्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपदाच्या ज्या जागा सोडण्यात आल्या आहेत तिथे इच्छुकांची गर्दी होणार आहे तर स्त्री सर्वसाधारण पडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पत्नीला संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.
चौकट
प्रवर्गनिहाय ग्रामपंचायतींची माहिती -
* अनुसूचित जाती ः कोंडअसुर्डे, काटवली, पाटगाव
* अनुसूचित जाती (स्त्री) ः उजगाव, आंबेड खुर्द, शिवधामापूर
* नागरिकांचा मागास प्रवर्ग ः नावडी, लोवले, देवळे, करजुवे, साखरपा, आंबवली, वाशीतर्फे संगमेश्वर, कोळंबे, घोडवली, कोंडकदमराव, तेऱ्ये, हरपुडे, बामणोली, कुरधुंडा, घाटीवळे, वांझोळे, चोरवणे.
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) ः मेढे तर्फे फुणगुस, ओझरेखुर्द, असुर्डे, शेंबवणे, कळंबुशी, किरडुवे, आंबव, ताम्हाणे, मांजरे, साडवली, मासरंग, कळंबस्ते, मांभळे, फुणगुस, माखजन, बोरसूत, शिवणे.
* सर्वसाधारण ः परचुरी, डिंगणी, वाशीतर्फे देवरूख, निवे बु., कोसुंब, करंबेळेतर्फे संगमेश्वर, वायंगणे, भडकंबा, पुर्येतर्फे देवळे, किरबेट, बोंडये, मारळ, खडीकोळवण, मोर्डे, कडवई, चिखली, कुचांबे, गोळवली, अंत्रवली, कसबा संगमेश्वर, कुंभारखाणी खुर्द, उमरे, गुरववाडी, पोचरी, कोंडगाव, सरंद, पेढांबे, कुळये, मुचरी, कांटे, कर्ली, धामापूरतर्फे देवरूख, तुळसणी, सायले, चाफवली, आंगवली, कासारकोळवण, राजवाडी, बुरंबाड, कुंभारखाणी बु, फणसवणे, मेघी, सांगवे,
* सर्वसाधारण (स्त्री) ः मुरादपूर, नांदळज, पांगरी, पूर, फणसवळे, विघ्रवली, सोनवडे, तिवरेतर्फे देवळे, मुर्शी, दाभोळे, कनकाडी, देवडे, निवेखुर्द, बेलारी बु., रांगव, धामणी, कारभाटले, नायरी, तिवरे घेरा प्रचितगड, कोंडिवरे, आरवली, मुरडव, नारडुवे, धामापूरतर्फे संगमेश्वर, तांबेडी, तुरळ, ओझरखोल, वांद्री, मावळंगे, कासे, राजिवली, ओझरेबुद्रुक, डावखोल, हातीव, कोंडये, पाचांबे, पिरंदवणे, आंबेड बु., शृंगारपूर, निवळी, शिरंबे, कुंडी, फणसट, पुर्येतर्फे सावर्डा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.