खेड ५७ ग्रामपंचायतींवर महिलाराज

खेड ५७ ग्रामपंचायतींवर महिलाराज

Published on

खेडमध्ये ५७ ग्रामपंचायतींवर महिलाराज
अनुसूचितसाठी एकच संधी ; खुल्या प्रवर्गासाठी समसमान जागा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १४ : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोमवारी (ता. १४) तहसील कार्यालयात जाहीर झाले असून, हे आरक्षण एप्रिल २०२५ ते मार्च २०३० या कालावधीसाठी आहे. यामध्ये तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर महिलाराज राहणार आहे. त्यातील खुल्या प्रवर्गासाठीच्या ग्रामपंचायती समसमान आहेत.
खेड येथील तहसील कार्यालयात आज सकाळी ११ वाजता तहसीलदार सुधीर मोरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारणसाठी प्रत्येकी ३८ जागा आहेत. या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळणार आहे. तसेच अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी एकमेव ग्रामपंचायत आहे. अनुसूचित जाती सर्वसाधारण व स्त्री प्रवर्गासाठी प्रत्येकी ३ जागा आरक्षित आहेत.

चौकट
प्रवर्गनिहाय आरक्षण
* अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्ग ः शिंगरी
* अनुसूचित जाती ः निळीक, बिजघर, भेलसई
* अनुसूचित जाती स्त्री प्रवर्ग ः कुळवंडी, मोरवंडे, शिर्शी
* सर्वसाधारण स्त्री : अलसुरे, आंबये, करटेल, कावळे, कासई, केळणे, खवटी, खोपी, गुणदे, चिरणी, जैतापूर, तळघर, तळवट खेड, तळवटपाल, तळे, दयाळ, दाभिळ, दिवाणखवटी, देवघर, धामनंद, नांद‌गांव, नांदिवली, बोरज, भडगांव, माणी, मुंबके, मुरडे, लवेल, शिवतर, शेल्डी, संगलट, सवनस, सवनसखुर्द, साखर, सात्वीणगांव, सुकदर, सुसेरी व हेदली.
* सर्वसाधारण प्रवर्गासाठी असगणी, आंजनी, आयनी (भिलारे), आष्टी, कर्जी, कळंबणीखुर्द, काडवली, किंजळेतर्फे नातू, कुंभाड, कुडोशी, कुरवळजावळी, कोतवली, कोरेगांव, घेरापालगड, चाकाळे, चिंचघर, चोरवणे, तिसंगी, तुंबाड, धामणदिवी, धामणी, पोसरेबुद्रुक, फुरूस, बोरघर, भोस्ते, मुसाड, मेटे, वावेतर्फे नातू, वेरळ, शिरगांव, शिवबुद्रुक, सवेणी, साखरोली, सापिर्ली, हुंबरी, होडखाड, जामगे व सुकिवली.
* नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ः आंबडस, कळंबणीबुद्रुक, कशेडी, घाणेखुंट, घेरारसाळगड, चिंचवली, तिसे, पन्हाळजे, भरणे, मोहाने, लोटे, वडगांव, वावेतर्फे खेड, शिरवली व शेरवल.
* नागरिकांचा मागास प्रवर्ग ः आंबवली, आवाशी, आस्तान, उधबेबुद्रुक, ऐनवरे, कसबानातू, कोंडीवली, तुळशीखुर्द, पोयनार, मांडवे, मिर्ले, वरवली, सोनगांव, चौगुले मोहल्ला बहिरवली, राजवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com