महानिर्मीतीच्या कंत्राटी कामगारांची गळचेपी थांबवा

महानिर्मीतीच्या कंत्राटी कामगारांची गळचेपी थांबवा

Published on

- ratchl१४२.jpg-
P२५N७७५१०
चिपळूण ः पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वागत करताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव.

महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांची गळचेपी
प्रशांत यादव ः मंजूर वेतन आणि प्रत्यक्षात मिळणारे यात तफावत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः अलोरे, पोफळी पंचक्रोशीतील महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांची गळचेपी सुरू आहे. त्यांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. मंजूर वेतन आणि प्रत्यक्षात कामगारांना मिळणारे वेतन यात मोठी तफावत आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीत काम करणाऱ्या त्या कामगारांचे शोषण थांबवा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
अलोरे व पोफळी परिसरातील कंत्राटी कामगारांच्या समस्यांविषयी रविवारी (ता. १३) पाली येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ठेकेदार व अधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री सामंत यांनी चिपळुणातील बहादूरशेखनाका येथे घेतलेल्या आढावा बैठकीत कंत्राटी कामगारांना मिळणाऱ्या अत्यल्प वेतनाचा मुद्दा मांडला होता. महानिर्मितीकडून सुमारे २२ ते २३ हजार रुपये वेतन कामगारांसाठी दिले जाते; मात्र प्रत्यक्षात कामगारांना १० ते १२ हजाराचे वेतन मिळते. त्यांचे बॅंक पासबूकदेखील दिले जात नाही. विविध सेवा सुविधा नाहीत. यावरून पालकमंत्री सामंत यांनी ठेकेदारांना नोटिसा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. या वेळी प्रशांत यादव यांनी कामगारांचे विविध प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. येथे कामगारांचा पुरवठा करणारे ८ ठेकेदार हे स्थानिकच आहेत तसेच कामगारदेखील स्थानिक आहेत. त्यामुळे स्थानिक कामगारांची गळचेपी होऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. याचवेळी ठेकेदारांनीही पालकमंत्र्याकडे आपली बाजू मांडली. मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कामगारांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस राजेंद्र महाडिक, विनोद झगडे, चंद्रकांत सुवार, सतीश पोद्दार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com