हॉटेल व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात

हॉटेल व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात

Published on

-rat१४p२३.jpg-
२५N७७५०९
रत्नागिरी ः मद्यावरील करवाढीविरोधात हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
----------
हॉटेल व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात
जिल्हा प्रशासनाला निवेदन ; अन्यायकारक करवाढी विरोधात आक्रमक पवित्रा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : राज्यशासनाने मद्यविक्रीवरील करांमध्ये केलेल्या अन्यायकारक वाढीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ही करवाढ तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनने आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. जर ही करवाढ रद्द झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा व्यावसायिकांनी दिला.
असोसिएशनचे सचिव सुनीलदत्त देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गेल्या काही महिन्यांपासून शासनाने विविध करांमध्ये मोठी वाढ केली आहे ज्यामुळे हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. या करवाढीमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदेशीर मार्गाने व्यवसाय करणे परवडणारे नसल्याने अनेक व्यावसायिक अवैध आणि अनधिकृत मद्यविक्रीकडे वळतील, ज्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडेल. परमीट रूममधील मद्यविक्री महागल्याने ग्राहक त्याकडे पाठ फिरवतील परिणामी, शासनाच्या उत्पन्नात मोठी घट होईल. शिवाय, शेजारील राज्यांमध्ये कर कमी असल्याने तेथून स्वस्त दरात मद्य आणून महाराष्ट्रात त्याची तस्करी वाढेल ज्यामुळे राज्याचे आर्थिक नुकसान होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अन्यायकारक करवाढीमुळे जिल्ह्यातील अनेक लहान-मोठे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याचा थेट परिणाम रोजगारावर होऊन जिल्ह्यात बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व गंभीर बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने या विषयात वैयक्तिक लक्ष घालून राज्य उत्पादन शुल्काअंतर्गत कर तसेच व्हॅट कमी करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी विनंती हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

चौकट
अवाजवी करवाढीचा फटका
ऑक्टोबर २०२४ मध्ये परमीट रूममधून होणाऱ्या मद्यविक्रीवरील व्हॅट ५ टक्केवरून सरळ १० टक्के करण्यात आला. त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये परमीट रूमच्या नूतनीकरण शुल्कामध्ये अचानक १५ टक्के वाढ करण्यात आली. आता जुलै २०२५ मध्ये मद्यविक्रीवरील अबकारी करात तब्बल ६० टक्केनी वाढ केली. या अवाजवी करवाढीमुळे हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचे असोसिएशनच्या निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com