प्रभागरतनेत ढाचा तोच काही नावात बदल
प्रभागरतनेत ढाचा तोच काही नावात बदल
चिपळूण तालुका ; २१ जुलैपर्यंत हरकती मागवल्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांसाठी प्रभागरचनेच्या घोषणेनुसार या आधी तालुक्यातील १ गट व २ गण वाढले होते. या वेळच्या प्रभागरचनेत केवळ काही गणांच्या नावांत बदल झाला असला तरी या आधीच्याच गावांचा समावेश आहे. या प्रभागरचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत.
निवडणुकीसाठी तालुक्यातील गटनिहाय गणांची प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कळवंडे गटात भोम व कळवंडे गणाचा समावेश आहे. भोम गणात मालदोली, गांग्रई, दोणवली, बिवली, करंबवणे, केतकी, कापरे, पोसरे, भोम, भिले तसेच कळवंडे गणात कोंढे, कळवंडे, कालुस्ते, धामेलीकोंड, कालुस्तेखुर्द, खोपड, शिरळ, रेहेळवैजी, पाचाड, मालघर. पेढे गटात पेढे व दळवटणे गणांचा समावेश आहे.
पेढे गणात परशुराम, पेढे, वालोपे, कळंबस्ते, खांदाटपाली, नवीन कोळकेवाडी, निरबाडे. दळवटणे गणात नांदिवसे, मोरवणे, वालोटी, आकले, कादवड, तिवरे, रिक्टोली, तिवडी, दळवटणेचा समावेश आहे. खेर्डी गटात खेर्डी व कापसाळ गण समाविष्ट आहेत. खेर्डी गणात केवळ खेर्डी गावचा समावेश आहे तर कापसाळ गणात मिरजोळी, कापसाळ, कामथे, कामथेखुर्द, धामणवणे. अलोरे गटात अलोरे व पिंपळीखुर्द गण आहेत. अलोरे गणात पेढांबे, कोळकेवाडी, नागावे, अलोरे. पिंपळी खुर्द गणात ओवळी, कळकवणे, गाणे, खडपोली, पिंपळीखुर्द, पिंपळीबुद्रुक, चिंचघरीचा समावेश आहे.
पूर्व विभागातील शिरगांव गटात वेहेळे व शिरगांव गण असून, वेहेळे गणात कान्हे, अडरे, वेहेळे, टेरव, मुंढेतर्फे चिपळूण, अनारी, तळसर. शिरगांव गणात कुंभार्ली, कोंडफणसवणे, पोफळी, शिरगांवचा समावेश आहे. सावर्डे गटात मांडकी व सावर्डे गण असून, सावर्डे गणात कोंडमळा, सावर्डे, कुडप. मांडकी गणात दहिवली, आगवे, मांडकी, खरवते, ढोक्रवली, पालवण, ओमळी. उमरोली गटात गुढे व उमरोली गण असून, उमरोली गणात रामपूर, कौंढरताम्हाणे, कात्रोळी, उमरोली, रावळगांव, पाथर्डी, निर्व्हाळ, तनाळी. गुढे गणात चिवेली, वाघिवरे, बामणोली, गुढे, बोरगांव, मार्गताम्हाणे, कळमुंडी, उभळे, गोंधळे, डुगवे. वहाळ गटात निवळी व वहाळ गण आहेत. निवळी गणात कळंबट, देवखेरकी, नारदखेरकी, शिरवली, ताम्हणमळा, तुरंबव, गुळवणे, आबिटगांव, निवळी. वहाळ गणात मूर्तवडे, ढाकमोली, पिलवलीतर्फे वेळंब, खांडोत्री, तोंडली, पिलवलीतर्फे सावर्डे, वीर, वहाळ. कोकरे गटात कुटरे व कोकरे गण आहेत. कोकरे गणात वडेरू, नायशी, कोकरे, असुर्डे, आंबतखोल, हडकणी, खेरशेत, कुशिवडे तर कुटरे गणात डेरवण, नांदगांव, कुटरे, कोसबी, मुंढेतर्फे सावर्डे, फुरूस, येगांव, तळवडे, दुर्गवाडी आदी गावांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.