स्टेअरिंगवरच कुत्र्याने उडी मारल्याने रिक्षा उलटली

स्टेअरिंगवरच कुत्र्याने उडी मारल्याने रिक्षा उलटली

Published on

-ratchl१४१०.jpg ः
२५N७७५३८
चिपळूण ः कुत्र्याच्या हल्ल्यामुळे उलटलेली रिक्षा.
------------
कुत्र्याने उडी मारल्याने रिक्षा उलटली
चिपळुणातील घटना ; प्रवासी महिला रुग्णालयात दाखल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः शहरातील बुरूमतळी येथील मुख्य रस्त्यावर सोमवारी विचित्र अपघात घडला. रस्त्यावर भटकणाऱ्या एका कुत्र्याने थेट रिक्षाचालकाने पकडलेल्या स्टिअरिंगवरच उडी घेतल्याने रिक्षा उलटली झाली. रिक्षेचा वेग कमी असल्याने आणि समोरून कोणते वाहन न आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या रिक्षात एक वयस्कर महिला होत्या. या प्रकारामुळे त्या घाबरल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
टेरव येथील परेश काणेकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन चिपळूणच्या दिशेने निघाले होते. या रिक्षात वयोवृद्ध महिला बसल्या होत्या. शहरातील पाग पॉवरहाऊस ते चिंचनाका या रस्त्यावरून जात असताना बुरूमतळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर अचानक एका कुत्र्याने थेट रिक्षात उडी घेतली. तो कुत्रा स्टिअरिंगवरच आदळल्याने आणि अचानक हा प्रसंग घडल्याने परेश काणेकर गोंधळून गेले. त्यांनी रिक्षा सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र कुत्र्याच्या धक्क्याने त्यांच्या हातातील स्टिअरिंग फिरले आणि रिक्षा उलटली. रिक्षामध्ये बसलेल्या आजी आणि परेश काणेकर हे देखील रिक्षासह रस्त्यावर कोसळले. या वेळी या परिसरात कोणतेही दुसरे वाहन न आल्याने मोठा अनर्थ टळला. देव बलवत्तर म्हणून आजी व परेश हे दोघेजण बालंबाल बचावले. ही घटना कळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातात त्या कुत्र्याचे प्राण गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com