शेती संरक्षणासाठी सौर कुंपण योजना
swt152.jpg
77679
हुमरमळा वालावलः वनपाल दिनेश टिपुगडे यांना शेती नुकसानीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी अतुल बंगे, अमृत देसाई आदी उपस्थित होते.
शेती संरक्षणासाठी सौर कुंपण योजना
वनपाल दिनेश टिपुगडेः हुमरमळा-वालावलमध्ये ग्रामस्थांची सभा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ः हुमरमळा वालावल गावात गव्यारेड्यांकडून सुरू असलेले शेतीचे नुकसान सत्र आणि स्मार्ट मीटरमुळे येणारी भरमसाठ वीज बिले यामुळे शेतकरी आणि ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. यासंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला वीज अधिकाऱ्यांनी दांडी मारली; मात्र वनपाल दिनेश टिपुगडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समर्पक उत्तरे दिली. वन विभागाकडून नुकसान भरपाई तसेच कायमस्वरुपी उपाय म्हणून अनुदानावर सौर उर्जा कुंपण योजना कार्यान्वित केली जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
सभेपूर्वी अतुल बंगे यांनी शेतकरी आणि वीज ग्राहकांच्या सभेच्या आयोजनाचे विश्लेषण केले. दरवर्षी शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे आपली शेती गमवावी लागते. गवे भर दिवसा शेतात गुरे चरत असल्याप्रमाणे राजरोसपणे फिरून नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. ग्राहकांचा विरोध असतानाही स्मार्ट मीटर बसविले जात असून आठशे रुपये येणारे बिल आता साडेसात हजार आले आहे. वीज ग्राहक ही बिले भरूच शकत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या सभेला माड्याचीवाडी, पाट, हुमरमळा, चेंदवण, पडोसवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी जागरुक राहुन स्मार्ट मीटर बसवून देऊ नये, असे आवाहन बंगे यांनी यावेळी केले. तसेच कर्मचारी मीटर बसविण्यासाठी आल्यास होणाऱ्या परिणामांना वीज अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
सरपंच अमृत देसाई यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसेविका अपर्णा पाटील, सुरेश वालावलकर, विकास तावडे, रमाकांत वालावलकर, विजू पेडणेकर, किशोर वालावलकर, विष्णू वालावलकर, सुमन वालावलकर, भरत परब, तात्या कद्रेकर, दीपक चव्हाण, गुंडू परब, तृप्ती राणे, मंदार वरक, संजय पेडणेकर, महेश कानडे, भरत शृंगारे, प्रणव घारे, संदीप तर्फे, गिरीश देसाई, पपू दळवी, आपा राणे, दर्शना मार्गी, ज्ञानदेव परब, यशवंत परब, नारायण राणे आदी उपस्थित होते.
चौकट
वीज अधिकारी फिरकलेच नाहीत
सभा सकाळी ११ वाजता सुरू झाली तरी वीज अधिकारी आंदुर्ले, पाट येथे असूनही सभेच्या ठिकाणी फिरकले नाहीत. सभेबाबत माहिती देऊनही वीज अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.