शालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा

शालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा

Published on

swt155.jpg
77682
कट्टा : बक्षीस वितरण सोहळ्यात व्यासपीठावर दिलीप गुराम, चार्टर्ड अकाऊंटंट मनीष चंद्रना, सुनील नाईक, सुनील गुराम व अन्य मान्यवर.

शालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा
दिलीप गुरामः कट्टा सेवांगणमध्ये बक्षीस वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ः ‘पुस्तकाने मला काय दिले?’ स्पर्धेला प्रतिसाद दिल्याबद्दल मुले व पालक यांचे खूप कौतुक वाटते. मुलांनी असेच आनंदाने शैक्षणिक कामात सहभागी होऊन आपली प्रगती करावी. सेवांगणला माझे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप गुराम यांनी कट्टा येथे केले.
बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे आचार्य पार्वतीकुमार व भाऊ गुराम स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ‘पुस्तकाने मला काय दिले?’ या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी चाटर्ड अकाऊंटंट मनीष चंद्रना, सुनील नाईक, सुनील गुराम, श्रध्दा नाईक, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, संपदा भाट, वैष्णवी लाड, दिलीप खोसला, कमलेश राऊत, शोभा म्हाडगुत, स्मिता गुराम, सोनाली भोजणे, श्रीकांत भोजणे, गुंजन राऊत, बाळकृष्ण गोंधळी, बाळू राणे, रिया जांभवडेकर, अर्चना धुत्रे उपस्थित होते.
प्रारंभी दीपक भोगटे यांनी सेवांगणच्या उपक्रमांची माहिती दिली. जयंत नारळीकर यांना आदरांजली म्हणून विज्ञाननिष्ठ नेते प्रा. मधू दंडवते, छत्रपती शाहू महाराज व नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके वाचनासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्या पुस्तकांवर पालक व विद्यार्थी यांनी संयुक्तपणे अभिप्राय लिहून या स्पर्धेत भाग घेतला. सुनील नाईक यांनी सेवांगण कट्टा यांच्या वतीने गेली अनेक वर्षे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम परिसरातील शाळांना झाला आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता वाढली आहे, असे सांगितले.
सुनील गुराम यांनी मुलांनी कसे वागावे, याचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मनीष चंद्रना यानी दिलीप गुराम यांचे व्यक्तिमत्व साकारणारी कविता सादर केली. वैष्णवी लाड यांनी सूत्रसंचालनासह पार्वतीकुमार यांचे चरित्र मुलांना सांगितले. दिलीप गुराम यांनी गावातील मान्यवर व सेवांगणचे कार्यकर्ते यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. स्पर्धेतील व सहभागी ५० विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रत्येक मुलाला १०० रुपयांचे कुपन शैक्षणिक भेटवस्तू खरेदी करण्यासाठी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com