केवळ फोटो
फोटोफिचर
संगमेश्वर, मंडणगडमध्ये पाणीच पाणी....
मंडणगड/संगमेश्वर ः संगमेश्वर आणि मंडणगड तालुक्यात सोमवारी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. संततधारेमुळे प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीजवळ आहेत. संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ बाजारपेठ पूर्णतः जलमय झाली आहे. पावसाने थैमान घातल्याने विद्यार्थ्यांना आज शाळेत पोहोचणे देखील अवघड झाले. मंडणगड तालुक्यातही मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी भरले असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्याची चित्रमय झलक...
rat15p11.jpg-
P25N77614
संगमेश्वर ः आठवडा बाजारात भरलेले पाणी.
rat15p12.jpg-
25N77615
शास्त्री आणि सोनवी नदीला आलेले पाणी बाजारपेठेतील इमारतीत शिरले.
rat15p2.jpg -
25N77595
इमारतीच्या सभोवती भरलेले पाणी
rat15p29.jpg -
25N77656
संमगेश्वर ः बुरंबी येथे पाणी भरल्याने येथील वाहतूक बंद झाली होती.
rat15p30.jpg -
P25N77657
संगमेश्वर ः मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, त्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
rat15p31.jpg -
25N77658
संगमेश्वर ः मुसळधार पावसामुळे पाणी भरल्याने हा डीपी पाण्यात जाऊन वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
rat15p22.jpg-
25N77649
मंडणगड ः भारजा नदीला पूर आल्याने कुंबळे येथील स्मशानभूमी पाण्यामध्ये गेली.
rat15p23.jpg-
P25N77650
मंडणगड ः घोसाळे-पणदेरी मार्गावर घाटात दरड रस्त्यावर आली.
rat15p24.jpg-
25N77651
मंडणगड ः सावरी-निगडीला जोडणाऱ्या फरशीवरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प.
rat15p25.jpg
25N77652
मंडणगड ः पाणीच पाणी झाल्याने तालुक्यातील भाताच्या खलाट्या पाण्यात बुडाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.