-पर्यावरण मंडळाने अनुभवली पावनखिंड
पर्यावरण मंडळाने अनुभवली पावनखिंड
रणसंग्रामदिन ; दीपकाडी कोकणेन्स दुर्मिळ वनस्पतीचीही पाहणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः सह्याद्रीतील निसर्गाला आणि स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने एकदिवसीय, पराक्रमी लढवय्ये आणि निसर्ग अभिवादन सहल काढण्यात आली.
शिवकाळात १२ आणि १३ जुलै १६६० रोजी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर, स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो बांदल आणि मराठा सैनिकांनी पावनखिंडीत (गजापूरची घोडखिंड) शत्रूच्या हजारो सैनिकांना कडवी झुंज दिली. यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या देदीप्यमान इतिहासाच्या रणसंग्रामदिनाचे स्मरण करण्यासाठी ही सहल करण्यात आली. या सहलीचे आयोजन मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक यांनी केले होते. पावनखिंडीत सुरू असलेले प्रबोधन मार्गदर्शन उपक्रम, आदरांजली, शाहिरी पोवाडे आदी उपक्रमांमध्येही पर्यावरणप्रेमींनी आपला सहभाग नोंदवला. स्थानिक गाइड बापू बावकर यांच्याकडूनही पर्यावरणप्रेमींनी इतिहास समजावून घेतला. पावनखिंड अनुभूती घेणाऱ्यात पर्यावरण मंडळाच्या विलास महाडिक, धीरज वाटेकर, विद्याधर अजगोलकर यांच्यासह सखीमंचच्या पदाधिकारी मायावती शिपटे, विनया देवरूखकर, सदस्या स्नेहल विचारे, नसरीन खडस, अनघा परचुरे, श्वेता चव्हाण, त्रिशला तलवारे, स्मिता वीरकर, वैशाली जाधव, अलका जोशी, वृषाली शिरगावकर, तेजस्वी मोहिते, नूतन महाडीक, जिज्ञा महाडीक यांनी सहभाग घेतला. सहलीतील उपस्थितांनी, पावनखिंडीतील इतिहासाच्या पाऊलखुणांचे आणि सह्याद्रीतील वाघझरा, कोकणकडा आदी भागांतील ज्या निसर्गाने हा इतिहास घडण्यात आपले योगदान दिले त्याचे दर्शन घेतले. या टीमने साडवली-देवरूख येथील सड्यांवर फुललेल्या प्रदेशानिष्ठ ''दीपकाडी कोकणेन्स'' या दुर्मिळ वनस्पतीचीही पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.