वृक्ष लागवडीसंदर्भात मळगावात जनजागृती

वृक्ष लागवडीसंदर्भात मळगावात जनजागृती

Published on

वृक्ष लागवडीसंदर्भात
मळगावात जनजागृती
सावंतवाडी ः शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेला मळगाव येथील अष्टविनायक ग्रुपतर्फे रोप भेट देण्यात आले. यावेळी ‘झाडे लावा-झाडे जगवा’, ‘हिरवळ वाढवा-जीवन समृद्ध करा’, ‘पर्यावरणाची सुरक्षा आपल्या हातात’ आदी संदेशपर फलकांद्वारे मुलांनी वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती केली. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, ज्ञानेश्वर राणे, एकनाथ गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष गोपाळ नार्वेकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, वर्षा गवस, सरिता पाटील, मळगाव इंग्लिश स्कूलचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, अथर्व धुरी, सुभाष नाटेकर आदी उपस्थित होते.
-----
कुडाळात रविवारी
पाककला स्पर्धा
कुडाळ ः सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळातर्फे कुडाळ येथे रविवारी (ता. २०) दुपारी ४ वाजता रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांनी शिजविलेली रानभाजी स्पर्धेसाठी आणावी. सोबत नमुना म्हणून अल्प प्रमाणात रानभाजीही आणावी. रानभाजीची पाककृती व आरोग्यासाठी तिचे महत्त्व एका स्वतंत्र कागदावर लिहून आणावे. ही स्पर्धा कुडाळ मराठा समाज भगिनी मंडळ, बालवाडीच्या इमारतीत घेण्यात येईल. प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन अशी आकर्षक पारितोषिके देण्यात येतील. नावनोंदणीसाठी अदिती सावंत, अदिती दळवी यांच्याशी संपर्क साधावा. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन भगिनी मंडळाच्या अध्यक्षा प्रज्ञा राणे यांनी केले आहे.
.................
वायंगणकर, साळवेंचा
मालवण येथे सत्कार
मालवण ः रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षिका स्मिता वायंगणकर व चंद्रशेखर साळवे यांचा सत्कार रोटरीचे अध्यक्ष पंकज पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून याही वर्षी दोन शिक्षकांचा सत्कार करण्याचे रोटरी क्लब मालवणतर्फे ठरविले होते. त्याचाच भाग म्हणून जय गणेश शाळेतील प्राथमिक विभागाच्या शिक्षिका स्मिता वायंगणकर व याच शाळेतील टेबल टेनिस प्रशिक्षक चंद्रशेखर साळवे यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे रंजन तांबे, सुहास ओरोसकर, भाऊ साळगावकर, उमेश सांगोडकर, अनिल चव्हाण, रमाकांत वाक्कर, रतन पांगे आदी उपस्थित होते.
...................
हळबे महाविद्यालयात
लोकसंख्या दिन साजरा
दोडामार्ग ः लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात अर्थशास्त्र व प्लानिंग फोरम विभागातर्फे ‘जागतिक लोकसंख्या दिन’ यावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून माजी प्राचार्य डॉ. हेमंत पेडणेकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील ‘आयक्यूएसी’चे समन्वयक प्रा. बर्वे आदी उपस्थित होते. डॉ. एस. यू. दरेकर यांनी प्रास्ताविक केले. पंकजा मणेरीकर हिने सूत्रसंचालन केले. नम्रता कासकर हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com