-भागोजीशेठ कीरांच्या स्मारकाला आणखी पाच गुंठे जागा

-भागोजीशेठ कीरांच्या स्मारकाला आणखी पाच गुंठे जागा

Published on

-rat१५p३४.jpg-
P२५N७७६९२
रत्नागिरी : विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत विधानसभेचे सचिव जितेंद्र भोळे, नवीनचंद्र बांदिवडेकर, आशिष पेडणेकर आदी.
-------------
‘भागोजीशेठ’ यांच्या स्मारकास पाच गुंठे जागा
मंत्री उदय सामंत ः तालुका भंडारी समाजसंघाचा गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : आपल्याला कोणता नवा आयडॉल शोधण्याची गरज नाही. दानशूर भागोजीशेठ कीर आणि मायनाक भंडारी हे आपले आयडॉल आहेत. दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या स्मारकाला आणखी पाच गुंठे जागा देऊ, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
तालुक्यातील भंडारी समाजातील विद्यार्थी, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारसोहळा कित्ते भंडारी हॉलमध्ये झाला. त्या वेळी ते बोलत होते. मंचावर महाराष्ट्र विधानसभेचे सचिव व मिऱ्‍या गावचे सुपुत्र जितेंद्र भोळे, एलआयसीचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक एस. बी. मायनाक, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघांचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्‍वस्त मंडळ अध्यक्ष आशिष पेडणेकर, निवृत्त उपविभागीय अधिकारी राजेंद्र बिर्जे, डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, निवृत्त डीवायएसपी विलास भोसले, निवृत्त मुख्याध्यापिका मनीषा नागवेकर, ज्येष्ठ उद्योजक सुनील भोंगले व प्रसन्न आंबुलकर आणि संघाचे अध्यक्ष राजीव कीर उपस्थित होते. दहावी, बारावी, पदवीधर, सीए, वकील, एमपीएससीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते केला.

चौकट १
यांचा झाला सत्कार
दहावीत ९० टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल अदिश नागवेकर याचा शिष्यवृत्ती, रोख परितोषिक देऊन विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बारावीतील जागृती मसुरकर हिने ९३.१३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सीए परीक्षेत यशाबद्दल आदिती नागवेकर व नयन सुर्वे, एमबीबीएस झालेला वेदांत मयेकर यांनाही गौरवण्यात आले. एमपीएससीतील शिवानी हातिसकर व पल्लवी नार्वेकर यांनाही गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com