सावंतवाडीत अनुसूचित जमातीसाठी शून्य जागा
77700
सावंतवाडीत अनुसूचित जमातीसाठी शून्य जागा
चिठ्ठीद्वारे सोडत; तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आज तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीत तालुक्यात अनुसूचित जातीसाठी एकूण ४ जागा आरक्षित झाल्या असून त्यातील २ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही, तर इतर मागास प्रवर्गासाठी १७ जागा आरक्षित असून त्यातील ८ महिला तर ९ जागा सर्वसाधारणसाठी राखीव आहेत. तसेच सर्वसाधारण आरक्षणामध्ये ४२ जागा असून त्यात २१ महिला व २१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
येथील बॅ. नाथ पै सभागृहात कळसुलकर प्राथमिक शाळेची दुसरीतील विद्यार्थिनी आरोही अमित अरवारी हिच्या हस्ते चिठ्ठी काढत सोडत जाहीर करण्यात आली. तहसीलदार पाटील, नायब तहसीलदार लता वाडकर, महसूल सहाय्यक रामचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतनिहाय जाहीर झालेल्या आरक्षण तपशिलानुसार, एकूण ३२ सरपंचपदे विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केली आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) एकूण ४ जागा आरक्षित असून त्यातील दोन महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यात सोनुर्ली व कलंबिस्त या महिलांसाठी तर कुणकेरी व तिरोडा या ग्रामपंचायती अनुसुचित जाती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.
अनुसूचित जमातीसाठी (एसटी) कोणतीही जागा आरक्षित नाही. इतर मागास प्रवर्गासाठी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) एकूण १७ जागा निश्चित असून पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव तर ९ जागा खुल्या आहेत. खुल्या प्रवर्गात आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये माजगाव, मळगाव, सातार्डा, दांडेली, धाकोरे, असनिये, केसरी-फणसवडे, रोणापाल आणि पडवे माजगाव यांचा समावेश आहे. इतर मागासवर्ग महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये चौकुळ, न्हावेली, कास, निगुडे, आंबेगाव, कवठणी, वेत्ये, सरमळे यांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ जागा आरक्षित असून खुल्या २१ व २१ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोलगांव, इन्सुली, आंबोली, मळेवाड, सांगेली, ओटवणे, शिरशिंगे, मडुरा, तळवणे, डिंगणे, डेगवे, वाफोली, विलवडे, देवसू-दाणोली, भालावल, ओवळीये, गुळदुवे, पारपोली, किनळे, आरोस व गेळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात बांदा, तळवडे, आरोंदा, कारिवडे, माडखोल, नेमळे, चराठे, निरवडे, आजगाव, शेर्ले, तांबोळी, वेर्ले, सातुळी-बावळाट, भोमवाडी, सावरवाड, सातोसे, नेतर्डे, पाडलोस, साटेली तर्फ सातार्डा, कोनशी-दाभिळ आणि नाणोस या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी सरपंच दत्ताराम उर्फ नाना पेडणेकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, नीलेश कुडव, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच सुनील गावडे, माडखोलचे माजी सरपंच संजय शिरसाट, तळवडेचे ग्रामपंचायत सदस्य दादा परब आदी उपस्थित होते.
----
न्यायालयीन निर्णयामुळे पुन्हा प्रक्रिया
दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत काढली होती. मात्र, न्यायालयीन निर्णयामुळे ती आरक्षण सोडत रद्द करीत आज नव्याने आरक्षण काढण्यात आले. यात मागील वेळी काढलेल्या आरक्षणावेळी कोलगाव सरपंचपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग खुल्या गटासाठी आरक्षित झाले होते. मात्र, यावेळी त्या ठिकाणी आरक्षणात बदल होऊन तिथे इतर मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी इच्छुक असलेल्या काहीजणांचा हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळाले.
................
काहींना धक्का; काहींना संधी
या आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना धक्का बसला तर काहींना अनपेक्षित संधी मिळाल्याने त्यांच्यासाठी आगामी निवडणुकीत मार्ग सुकर झाला आहे. गावागावांमध्ये या आरक्षणामुळे नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली असून सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्यांनी आता पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.