महिला आरक्षणामुळे इच्छुकांची दांडी गुल
77701
महिला आरक्षणामुळे इच्छुकांची दांडी गुल
७२ ग्रामपंचायती; देवगडमधील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः तालुक्यातील एकूण ७२ ग्रामपंचायतीच्या प्रवर्गनिहाय सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये सरपंच पदासाठीचे मनसुबे रचलेल्या इच्छुकांची निराशा झाली. महिला आरक्षणामुळे इच्छुकांची दांडी गुल झाली. तर काहींना आरक्षणातून दिलासा मिळाल्याचेही चित्र होते. आरक्षणामुळे आगामी पाच वर्षातील गावागावातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण असलेल्या ठिकाणी आतापासूनच शोधमोहिम सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची धावपळ वाढणार आहे.
येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत पुढील पाच वर्षासाठी तालुक्यातील एकूण ७२ ग्रामपंचायतीच्या प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने (चिठ्या टाकून) निश्चित करण्यात आले. यापूर्वी ८ एप्रिलला आरक्षण सोडत काढली होती. मात्र, शासनाच्या नव्या अद्यादेशामुळे पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढली गेली. यावेळी तहसीलदार पवार यांच्यासह नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, नायब तहसीलदार व्ही. व्ही. शेठ, नायब तहसीलदार संतोष खरात, नायब तहसीलदार छाया आखाडे यांच्यासह विनायक शेटये आदी उपस्थित होते. पार्थ नलावडे, जयलक्ष कोयंडे, प्रणव ठाकूर या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्या निवडल्या.
पुढील पाच वर्षांत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीमध्ये अनुसुचित जाती महिलांसाठी २, अनुसुचित जमातीतील महिलांसाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १० आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी २४ अशी एकूण ३७ सरपंच पदे महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली. उर्वरीत ३५ सरपंच आरक्षित पदांमध्ये अनुसुचित जातीसाठी २, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १० व खुल्या प्रवर्गासाठी २३ सरपंच पदे आरक्षित करण्यात आली. २०११ ची सुमारे १ लाख ४ हजार ९५२ लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण सोडत काढली. तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले. आरक्षण सोडतीवेळी विविध राजकीय पक्षांची मंडळी, काही विद्यमान सरपंच, संभाव्य इच्छुक आदी उपस्थित होते. आरक्षण सोडतीने नव्या उमेदीने आलेल्या इच्छुकांची पार निराशा केली. तर काहींना आरक्षणाने सुखद धक्काही दिला. आरक्षणामुळे आतापासूनच राजकीय रणनितीला सुरूवात होईल असे दिसते. दरम्यान, एप्रिलमध्ये काढलेल्या आरक्षणामध्ये थोडा बदल झाल्याने काहीजण चिंतेत पडले.
.........................
ग्रामपंचायतनिहाय सरपंच पद आरक्षण
अनुसुचित जाती (आरक्षित पदे २) -हडपीड, कुणकवण, महिलांसाठी पदे २ -दहिबांव, महाळुंगे, अनुसुचित जमाती महिलांसाठी पद १ -पेंढरी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पदे १० -बुरंबावडे, उंडील, तोरसोळे, मुणगे, गवाणे, विजयदुर्ग, कातवण, कट्टा, शिरगांव, दाभोळे, महिलांसाठी पदे १० -कुवळे, वळिवंडे, हिंदळे, पावणाई, मणचे, टेंबवली, वाडा, आरे, खुडी, फणसे, खुला प्रवर्गामध्ये पदे २३ -कुणकेश्वर, तांबळडेग, शिरवली, सौंदाळे, पोंभुर्ले, कोटकामते, तिर्लोट, रहाटेश्वर, पोयरे, गिर्ये, साळशी, गोवळ, फणसगांव, विठ्ठलादेवी, लिंगडाळ, मोंड, वाघोटण, रामेश्वर, धालवली, वानिवडे, मळेगाव, पडवणे, ठाकूरवाडी, महिलांसाठी पदे २४ -कोर्ले, मिठमुंबरी, चांदोशी, ओंबळ, नारिंग्रे, नाडण, नाद, वाघिवरे, किंजवडे, पडेल, तळवडे, बापर्डे, वरेरी, मिठबांव, पाटगांव, सांडवे, चाफेड, पाटथर, पाळेकरवाडी, मोंडपार, इळये, गढीताम्हणे, मुटाट, पुरळ
.................
महिला प्रवर्गासाठी ३७ सरपंच पदे
तालुक्यातील एकूण ७२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठीच्या आरक्षण सोडतीमध्ये एकूण ३७ सरपंच पदे महिला प्रवर्गासाठी आरक्षित केली आहेत. तर उर्वरित ३५ सरपंच पदे प्रवर्गासाठी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.