मळेवाडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

मळेवाडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

Published on

77710
अक्षरा नाईक

मळेवाडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

विहिरीत मृतदेह; दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ : मळेवाड येथील एका नवविवाहितेने माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षरा अक्षय नाईक (वय २६) असे तिचे नाव असून, दोन महिन्यांपूर्वीच तिचा मळेवाड येथील अक्षय यांच्याशी विवाह झाला होता. अक्षराचे माहेरचे नाव प्रतीक्षा परब होते. तिचा मृतदेह आज सकाळी न्हावेली-देऊळवाडी येथील घराशेजारील विहिरीत तरंगत्या अवस्थेत आढळला.
याबाबतची अधिक माहिती अशी, अक्षरा ही सोमवारी दुपारी आपल्या माहेरी न्हावेली येथे आली होती. घरातील मंडळी शेतीच्या कामासाठी गेली असल्याने ती घरी एकटीच होती. सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर ती दिसली नाही, त्यामुळे त्यांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. आज सकाळी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच न्हावेलीचे पोलिसपाटील सावळाराम न्हावेलकर, सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आणि उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे आणण्यात आला. याठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे न्हावेली आणि मळेवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
-----------------
कारण अस्पष्ट
अक्षराचा तळवडे येथे टेलरिंगचा व्यवसाय होता. विशेषतः दशावतार नाट्य कलाकारांचे दशावतारी कपडे ती शिवून देत असे. तिने नेमकी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. तिच्या माहेरच्यांचे म्हणजेच आई-वडिलांचे जबाब घेतले असून, त्यांची काहीच तक्रार नसल्याचे उपनिरीक्षक मुळीक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com