कणकवलीत ६४ पैकी ३३ महिला सरपंच आरक्षित
77716
कणकवलीत ६४ पैकी ३३ महिला सरपंच आरक्षित
आरक्षण सोडत; ‘नवीन कुर्ली वसाहत’साठी प्रथमच निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी आज येथे सरपंचपदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये ३३ ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच विविध आरक्षणाने निश्चित केली आहेत. या वेळेस नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक होणार आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आजही आरक्षण सोडत जाहीर केली.
येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत थेट सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
विद्यामंदिर हायस्कूलची चौथीत शिकणारी भार्गवी केळुस्कर आणि रितेश पाटील या विद्यार्थ्यांनी सोडतीच्या चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर केले. यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी ५ ग्रामपंचायती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती, तर सर्वसाधारणसाठी ४२ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या. ज्या ग्रामपंचायतींमध्ये २०१० मध्ये आरक्षण होते, याचा विचार करून सोडत झाली. ज्या ग्रामपंचायतीत २०२० मध्ये महिला आरक्षण होते, त्या ग्रामपंचायतीतून महिला आरक्षणात वगळले.
अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षित ग्रामपंचायती अशा ः नवीन कुर्ली वसाहत, शिरवल आणि वाघेरी. अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी पिसेकामते आणि दारिस्ते. नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये १७ पैकी ९ ग्रामपंचायत या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. यामध्ये कलमठ, नडगिवे, लोरे, वागदे, खारेपाटण, हरकुळ बुद्रुक, जानवली, आशिये आणि नरडवे ग्रामपंचायतचा समावेश आहे. तर उर्वरित नागरिकांचा मागास प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी ओटव, ओझरम, ओसरगाव, कासार्डे, वरवडे, फोंडाघाट, बोर्डवे, आयनल या ग्रामपंचायती निश्चित झाल्या. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ४२ पैकी २१ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या. यामध्ये असलदे, कळसुली, कसवण-तळवडे, कुरंगवणे-बेर्ले, कोंडये, कोळोशी, गांधीनगर, डामरे, तळेरे, तिवरे, नांदगाव, पियाळी, शिवडाव, सांगवे, साळिस्ते, बेळणे खुर्द, तरंदळे, भरणी, चिंचवली, नाटळ, शिडवणे आणि घोणसरी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उर्वरित सर्वसाधारण ग्रामपंचायतींमध्ये करंजे, करूळ, कासरल, कुंभवडे, तोंडवली-बावशी, दारूम, दिगवळे, नागवे, बिडवाडी, भिरवंडे, माईण, वायंगणी, वारगाव, शेर्पे, सातरल, हळवल, हुंबरठ, पियाळी, हरकुळ खुर्द, साकेडी आणि सावडाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यावेळी निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, नायब तहसीलदार विजय वरक, मंडळ अधिकारी मनिषा बोडवे, सत्यवान खाड्ये, संभाजी माळवे यांच्यासह महसूलचे कर्मचारी तसेच हेमंत परूळेकर, सचिन पारधीये, नितीन गावकर, मंगेश बोभाटे आदी उपस्थितीत होते.
-------------------------
आरक्षण असे
- अनुसूचित जाती (महिला) ः नवीन कुर्ली वसाहत, शिरवल, वाघेरी.
- ओबीसी (महिला) ः कलमठ, नडगीवे, लोरे, वागदे, खारेपाटण, हरकुळ बुद्रुक, जानवली, आशिये आणि नरडवे.
- सर्वसाधारण (महिला) ः असलदे, कळसुली, कसवण- तळवडे, कुरंगवणे- बेर्ले, कोंडये, कोळोशी, गांधीनगर, डामरे, तळेरे, तिवरे, नांदगाव, शिवडाव, सांगवे, साळिस्ते, बेळणे खुर्द, तरंदळे, भरणी, चिंचवली, नाटळ, शिडवणे आणि घोणसरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.