तळेबाजार शाळेत रेनकोटचे वाटप

तळेबाजार शाळेत रेनकोटचे वाटप

Published on

swt1516.jpg
77723
तळेबाजार ः येथे विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.

तळेबाजार शाळेत रेनकोटचे वाटप
देवगडः शिरवल (ता. कणकवली) येथील प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने तालुक्यातील तळेबाजार येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील मुलांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रतिनिधी प्रशांत गावडे यांच्या उपस्थितीत याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य मनीष परब, मिथुन लाड, ऋषिकेश धुरी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक समीर कुडाळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश लब्दे, उपाध्यक्ष प्रियांका म्हापसेकर, शिक्षिका मीना सरकते, स्नेहा वागंणकर, अंगणवाडी सेविका शोभा कुबडे, मदतनीस साटम, विनायक धुरी आदी उपस्थित होते. प्राणजीवन सहयोग संस्था विविध सामाजिक उपक्रम राबविते. यावर्षी संस्थेमार्फत राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.
......................
swt1520.jpg
77724
देवगड ः येथील महाविद्यालयात आपत्ती प्रशिक्षण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

केळकर महाविद्यालयात
आपत्ती सुरक्षा प्रात्यक्षिके
सकाळ वृत्तसेवा
देवगडः येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागामार्फत राष्ट्रीय आपत्ती पथकाच्या वतीने (एन.डी.आर.एफ.) महाविद्यालयात आपत्ती सुरक्षा प्रशिक्षण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आपत्तीवेळी घ्यावयाची काळजी याबाबत यावेळी मार्गदर्शन केले गेले. भूकंप, भूस्खलन, पूर परिस्थिती आदी आपत्तीजन्य परिस्थितीत बचाव कसा करावा, याची माहिती देण्यात आली. विविध प्रात्यक्षिके दाखवत सुमारे १८ जवानांनी टीम कमांडर इन्स्पेक्टर आर. जे. यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक दाखविले. या प्रशिक्षणाचा १०६ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी निवासी नायब तहसीलदार व्ही. व्ही. शेठ, महसूल कर्मचारी प्रदीप कदम आणि गणेश कुबल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रभारी प्राचार्य व्ही. बी. कुनुरे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुनेत्रा ढेरे यांनी केले. त्यांना शामली तारी व प्रीती सारंग यांनी सहकार्य केले.
........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com