शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 
‘एस. एम.प्रशालेचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ‘एस. एम.प्रशालेचे यश

Published on

77740

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये
‘एस. एम. प्रशालेचे यश

कणकवली, ता. १५ ः महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषद, पुणेमार्फत झालेल्‍या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या परीक्षेत पाचवीतील पद्मज योगेश महाडिक २२४ गुण, कार्तिक विकास साईल २०२ गुण या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली.
इयत्ता आठवीतील सुमंगल श्रीवल्लभ शिखरे २३२ गुण, जस्मिता संजय पावसकर २०२ गुण, अथर्व संतोष राठवड १९२ गुण, गौरव अजित जगदाळे १९० गुण, राजलक्ष्मी संग्राम पाटील १८८ गुण या पाच विद्यार्थ्यांनी शहरी विभागात शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. या परीक्षेसाठी प्रशालेचे सहायक शिक्षक एस. एम. नौकुडकर, एन. एन. तायशेटे, व्ही. एस. सातपुते, एस. एस. पाटील, पी. पी. पराडकर, सौ. एस. सी. मयेकर, शिष्यवृत्ती विभागप्रमुख एन. के. केसरकर व एस. एम. पवार यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. एस. सी. सावंत, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉ. एस. एन. तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर, मुख्याध्यापक जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक आर. एल. प्रधान, पर्यवेक्षक जी. ए. कदम आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com