संगमेश्वर-संगमेश्वर तालुक्यात पावसाने दाणादाण
rat15p35.jpg-
77736
संगमेश्वर ः मुसळधार पावसामुळे रामपेठ बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले.
--------------
संगमेश्वर तालुक्यात पावसाने दाणादाण
रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती; कसबा, डिंगणी, देवरूख मार्गावरील वाहतूक विस्कळीत
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः तालुक्यात सोमवारी (ता. १४) रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढल्यामुळे रामपेठ बाजारपेठेत पाणी भरले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आज शाळेत पोहोचणेदेखील अवघड झाले.
रामपेठ येथील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ पाण्याखाली गेले असून व्यापार ठप्प झाला आहे. अनेक दुकाने आणि घरे पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. या आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून संगमेश्वरचे पोलिसपाटील कोळवणकर यांनी सांगितले की, शास्त्री नदीची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आपले मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणताही अनर्थ टाळण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.
संगमेश्वर-कसबा मार्गावर कसबा येथे शास्त्री नदीचे पाणी मोरीवर आल्याने संगमेश्वर-कसबा-नायरी वाहतूक मंदगतीने सुरू होती. कसबा इंग्लिश स्कूल शाळेच्या तळघरातील वर्गात पुराचे पाणी शिरले. संगमेश्वर-डिंगणी मार्गावरही शास्त्री नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पुराचे पाणी भरल्यामुळे ठप्प झाली.
चौकट
संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी
संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले. सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शास्त्री आणि सोनवीला मोठ्या प्रमाणात पूर आला. संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले. संततधार सुरूच असल्याने पुराचे पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संगमेश्वर येथील नदी किनाऱ्यालगतच्या व्यापाऱ्यांनी आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. तसेच चौपदरीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने तसेच महामार्गावरील पाण्याचे नियोजन नसल्याने संगमेश्वर परिसरातील वाहतूक संथगतीने सुरू होती.
चौकट
संगमेश्वर-देवरूख मार्ग बंद
संगमेश्वर-देवरूख मार्गावर बुरंबीनजीक तीन ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग सकाळी आठ वाजल्यापासून बंद पडला. या मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद झाल्याने आज अनेकांची मोठी गैरसोय झाली. बुरंबीनजीक संगमेश्वर-देवरूख मार्गाची तीन ठिकाणी उंची वाढवावी, अशी मागणी या निमित्ताने वाहनचालक आणि प्रवासीवर्गाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.