मंडणगडात मुसळधारेने जनजीवन विस्कळित
-rat१५p२१.jpg ः
P२५N७७६४८
वलोते ः पाण्याच्या प्रवाहात रस्त्याचे डांबरीकरण वाहून गेले.
----
मुसळधारेने जनजीवन विस्कळित
मंडणगडात भारजा, निवळी नद्यांना पूर ; वाहतूक ठप्प
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १५ ः तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढ्यांना पूर आल्याने पूल, रस्त्यावरून पाणी वाहू लागले. परिणामी, तालुक्यात ग्रामीण भागात वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. जुलै महिन्यात काही दिवस विश्रांती घेणाऱ्या पावसाने तालुक्यात जोरदार पुनरागमन केल्याने १५ जुलैला तालुक्यात सरासरी ११४ मिमी पावसाची नोंद झाली.
मंडणगड महसूल मंडळात १३० मिमी, म्हाप्रळ- ७०, देव्हारे- सर्वाधिक १५०, वेसवी मंडळात १०६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या हंगामास सुरुवात झाल्यापासून १५ जुलैअखेर तालुक्यात एकूण १४०२.५ मिमी पाऊस पडला आहे. तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सावित्री या मुख्य नदीसही भारजा निवळी या उपनद्या व गावागावातील ओढे व पऱ्हे यामध्ये पाण्याची पातळी वाढली. ते दुथडी भरून वाहल्याने गावागावातील लहान मोऱ्या व पुलांवरून पाणी गेल्याने ग्रामीण भागाच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेला संपर्क काही काळासाठी तुटला. सोमवारी रात्रीनंतर तालुक्यात पावसाने रौद्र रूप धारण केले. मंगळवारी दिवसभर पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरू होता.
घोसाळे-पणदेरी घाटात दरड व झाडे रस्त्यावर आल्याने वाहतूक खोळंबली होती. पावसामुळे तालुक्यातील केळवत, तुळशी, शेनाळे, पालवणी, उमरोली या घाटांमधील माती रस्त्यावर वाहून आली; मात्र त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला नाही. भिंगळोली येथे मुख्य रस्त्याला पाणी भरल्याने मुख्य रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरले. ग्रामीण भागात अनेक लहान मोऱ्यांवरून पाणी गेल्याने विद्यार्थ्यांची शाळेची अडचण निर्माण झाली. प्रामुख्याने सुर्ले येथे पुलावरून पाणी गेल्याने पाट, सुर्ले, गवाणवाडी, मनवळ कोंड, ढांगर, बुरी, गोवले, सुर्ले गावठाण या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक बंद झाल्याने शिक्षक व ग्रामस्थांची अडचण झाली. शहरातील शाळा व महाविद्यालयांचे कामकाज सुरू होते. ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी पावासाची परिस्थिती पाहून स्थानिक स्तरावर शाळांना सुटी देण्यात आली.
---
दृष्टीक्षेप
* भारजा, निवळी नद्यांना महापूर
* घाटात दरड कोसळून वाहतुकीला अडथळा
* वलौते येथे पाण्याच्या प्रवाहात रस्ता वाहून गेला
* चिंचघर मांदिवली पुलावरून पाणी
* कुंबळे स्मशानभूमी पुराच्या पाण्यात
* सावरी निगडीदरम्यान फरशीवरून पाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.