भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून मुलाला वाचवले

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून मुलाला वाचवले

Published on

-rat१५p२८.jpg-
P२५N७७६५५
दापोली ः भररस्त्यात भटक्या कुत्र्यांमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
------------
कुत्र्याच्या हल्ल्यापासून मुलाला वाचवले
सलीम रखांगे यांचे प्रसंगावधान ; कार्यवाहीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १५ : दापोली शहरातील काळकाईकोंड परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. या कुत्र्यांनी इमारतीसमोर खेळत असलेल्या एका लहान मुलावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुलगा प्रचंड घाबरला होता. या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते सलीम रखांगे यांनी प्रसंगावधान राखत धाडसाने पुढे येत त्या मुलाला सुखरूप वाचवले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि एका बालकाचा जीव वाचला. दापोली नगरपंचायतीने तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक व उसी रेसिडेन्सी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com