कुडाळात ‘कही खुशी; कही गम’

कुडाळात ‘कही खुशी; कही गम’

Published on

77748

कुडाळात ‘कही खुशी; कही गम’

सरपंच आरक्षण; ६८ ग्रामपंचायतींसाठी सोडत जाहीर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींचे २०२५-३० या कालावधीसाठी सरपंच आरक्षण सोडत तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी जाहीर केले. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुक उमेदवारांचे चेहरे उदास झाले, तर काहींना अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे सुखद धक्का बसला असून ते आनंदीत झाल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. काही इच्छुकांनी फोनवरूनच आरक्षणाची माहिती घेतली.
येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये आज सरपंच आरक्षण सोडतीची चिठ्ठी तहसीलदार वसावे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ पडतेवाडी शाळेतील पहिलीची विद्यार्थिनी ऋत्वी धुरी व चैत्राली वारंग या दोन मुलींच्या हस्ते काढण्यात आली. आरक्षण सोडत अशी ः अनुसूचित जाती (महिला) - बांबुळी, वाडीवरवडे, आंबडपाल. अनुसूचित जाती सर्वसाधारण-रानबांबुळी, निरुखे. नागरिकांचा मागास प्रवर्ग-घोटगे, वसोली, ओरोस बुद्रुक, हुमरमळा-वालावल, माड्याचीवाडी, गोठोस, पुळास, कसाल, केरवडे तर्फ माणगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-पावशी, मांडकुली, हुमरमळा-अणाव, पिंगुळी, निवजे, तुळसुली कर्याद नारुर, नानेली, माणगाव, गोवेरी. खुला प्रवर्ग-भरणी, भडगाव बुद्रुक, नारुर कर्याद नारुर, गावराई, सरंबळ, तेर्सेबांबर्डे, कुपवडे, वेताळ बांबर्डे, बिबवणे, हिर्लोक, कालेली, केरवडे कर्याद नारुर, घावनळे, परबवाडा पाट, सोनवडे तर्फ कळसुली, वाडोस, नेरुर कर्याद नारुर, साळगाव, आवळेगाव-ओरोस खुर्द, डिगस, कवठी, सोनवणे तर्फ हवेली. खुला प्रवर्ग (महिला)-तेंडोली, वालावल, आंदुर्ले, झाराप, चेंदवण, पणदूर, पोखरण-कुसबे, हुमरस, कुंदे, मुळदे, पांग्रड, तुळसुली तर्फ माणगाव, शिवापूर, पडवे, कडावल, आकेरी, बांव, वर्दे, गिरगांव-कुसगाव, अणाव, जांभवडे, नेरुर देऊळवाडा. अनुसूचित जमाती प्रवर्ग एक-आंब्रड. यावेळी अमरसेन सावंत, संदीप राणे, आर. के. सावंत, नागेश आईर, अतुल बंगे, तानाजी पालव, गोट्या चव्हाण, समाधान परब, श्री. शृंगारे, सचिन धुरी, राजन भगत, विनायक राणे आदी उपस्थित होते.
...................
हरकतींचे निरसन
कुडाळ तालुक्यात ६८ ग्रामपंचायती आहेत. आजच्या सरपंच सोडतमध्ये उपस्थित सर्व नागरिकांनी चांगले सहकार्य केले; त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत शांततेत पार पडली. यावेळी काही नागरिक, पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या, हरकती मांडल्या; त्या सर्वांचे आम्ही याच ठिकाणी निरसन केले, अशी माहिती हसीलदार वसावे यांनी दिली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंग जाधव, महसूलचे संजय गवस, निवडणूक नायब तहसीलदार प्रमोद पिळणकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com