लोगो स्पर्धेत कालकर प्रथम
-rat१५p१४.jpg-
P२५N७७६१७
पावस ः पेजे महाविद्यालयात आयोजित स्पर्धेतील विजेत्यासह मान्यवर.
------
‘इनोव्हेटिव्ह लोगो’ स्पर्धेत कालकर प्रथम
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागांतर्गत इनोव्हेटिव्ह लोगो आणि सिग्नेचर (सही) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये असणारी नवनिर्मिती शोधक पद्धतीने विस्थापित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कल्पकतेकडे वळवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन वाणिज्य विभागप्रमुख अमित पवार यांनी केले. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा बहुमोल प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सायली दीपक कालकरने प्रथम, सृष्टी तेरवणकरने द्वितीय, आकांक्षा कुळयेने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक यांनी केले.
-rat१५p१५.jpg-
२५N७७६१८
अथर्व कानिटकर
अथर्व कानिटकरचे सीए परीक्षेत यश
रत्नागिरी ः माळनाका येथील रहिवासी अथर्व कानिटकर याने सीएच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अथर्वने पहिल्याच प्रयत्नात ही पदवी मिळवली. बाविसाव्या वर्षी अथर्व हा सनदी लेखापाल म्हणजेच सीए झाला. अथर्वने मे २०२५ मध्ये ही परीक्षा दिली होती. त्याच्या यशाचे श्रेय वडील वैभव कानिटकर, आई ऐश्वर्या कानिटकर यांना व कुटुंबाला दिले आहे.
गुरूपौर्णिनिमित्त शुभेच्छा कार्ड स्पर्धा
दापोली ः तालुक्यातील केळशी शाळेत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कृषी महाविद्यालयातील रावेच्या वसुधा गटाच्यावतीने ‘सृजन सप्तरंग’ हे विद्यार्थ्यांची सृजनशीलता, कला, संवादकौशल्य व शिस्त वाढवणारे सातदिवसीय शिबिर झाले. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवसाला विशिष्ट रंग व उपक्रम राबवण्यात आले. शिबिरात शेतकऱ्यांना विविध वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली. अभिनय कार्यशाळा घेण्यात आले. यामध्ये नाट्यप्रकार, भावाभिव्यक्ती, संवाद आदींचे सादरीकरण करण्यात आले. कार्यानुभवामधून हस्तकला, चित्रकला, शुभेच्छा पत्रलेखन करण्यात आले. या वेळी बेंदूर सण कविता वाचन व हस्ताक्षर स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला. गुरूपौर्णिनिमित्त शुभेच्छाकार्ड तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली.
अध्यापन वर्ग व योग कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये वसुधा गट विद्यार्थिनींनी शाळेत विविध विषयांच्या तासिका घेतल्या व योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली. या वेळी मुख्याध्यापक संदीप तळदेवकर, शिक्षकवृंद, कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.