गांजा - बेळगाव

गांजा - बेळगाव

Published on

सिंधुदुर्गच्या एकासह तिघांना
बेळगावात गांजा विकताना अटक

दोन ठिकाणी कारवाई; ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. १५ ः बेळगाव शहरात गांजा आणि इतर अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत सुमारे ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ह जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.
मंगळवारी (ता. १५) खडेबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सरदार्स मैदानाजवळील गॅलरीजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करताना आसिफ अब्दुगणी हुबळीकर (३८, रा. गुलझार गल्ली, न्यू गांधीनगर, बेळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १२ हजार किमतीचा ०.४६० ग्रॅम गांजा, दोन हजार रुपये किमतीचा मोबाइल, २० हजार किमतीची दुचाकी (केए-२२ एचई ७०६६) आणि २७० रोख रकम असे मिळून ३४ हजार २७० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याचदिवशी एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात नागेश मधुकर भगत (३४, रा. गरड मजगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) व विनायक सुब्बाराव बेन्नाळकर (रा. रामनगर, कंग्राळी केएच, बेळगाव) हे दोघे गांजाची विक्री करताना अढळून आले. त्यांच्याकडून दोन हजार ३७० किमतीचा ०.२५० ग्रॅम गांजा, १५,००० किमतीची दुचाकी (केए-२२ एचएस ८५०९) गांजाची पाने पोलिसांनी जप्त केली आहेत. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५१ हजार ६४० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com