केंद्रीय पथकाकडून सत्कोंडी ग्रामपंचायतीची पाहणी
केंद्रीय पथकाकडून सत्कोंडी ग्रामपंचायतीची पाहणी
स्वच्छ सर्वेक्षण २०२५ उपक्रम; नागरिकांशीही साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : भारत स्वच्छ मिशनअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२५ ची तपासणी सुरू झाली असून रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी ग्रामपंचायतीची तपासणी केंद्रस्तरीय पथकाकडून करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी भारतातील काही निवडक ग्रामपंचायतींची निवड केलेली आहे.
भारत स्वच्छ मिशनचा टप्पा क्रमांक २.१ हा २ ऑक्टोबर २०२० ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२५ ची तपासणी केंद्रस्तरीय पथकाकडून केली जात आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातून निवडलेल्या पाच पैकी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीची तपासणी रविवारी (ता. १३) केंद्रीय पथकाने पाहणी केली. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ च्या निकषांनुसार शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, वैयक्तिक व दिव्यांग कुटुंबाना भेट देऊन स्वछतागृह व परिसर पाहणी केली. याचसोबत गावातील शोषखड्डे, कचरा विलगीकरण शेड, हँडवॉश स्टेशन, परसबाग निर्मिती, रस्ते सफाई, गांडूळखत प्रकल्प, गटारे यांची पाहणी या केंद्रस्तरीय पथकाने केली. शिक्षक, अंगणवाडी, आरोग्यविभाग, ग्रामपंचायत, बचतगत कर्मचारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. या केंद्रस्तरीय समितीमध्ये संपूर्ण देशात तपासणीचा मक्ता मिळालेल्या संस्थेचे अमोल राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद पाणी गुणवत्ता तालुका समन्वयक अधिकारी सविनय जाधव, कृषिविस्तार अधिकारी अक्षय शिंदे आदी अधिकारी यांनी काम पाहिले. तर या सर्व तपासणीसाठी लगतच्या नांदीवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संदीप जाधव व सैतवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ओमकार शिर्के यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी उपस्थितांमध्ये ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीचे सरपंच सतीश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण मोर्ये, ग्रामसेवक, श्रीकांत कुळ्ये, ग्रामपंचायत सदस्य अजय काताळे, प्रणाली मालप, समीक्षा घाटे, ममता बंडबे, निकिता शिगवण, ग्रामपंचायत कर्मचारी सत्कोंडीचे पोलिस पाटील श्रीकांत खापले आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.