सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघ कुडाळ आगार अध्यक्षपदी साईल
swt161.jpg
77898
दादा साईल, रुपेश कानडे, ॲड. राजीव कुडाळकर
सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघ
कुडाळ आगार अध्यक्षपदी साईल
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ कुडाळ आगाराची २०२५-२६ ची नूतन कार्यकारिणी विभागीय उपाध्यक्ष नीलेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीत आगार सचिव मिथुन बांबुळकर यांनी जाहीर केली. संघटनेच्या कुडाळ आगार अध्यक्षपदी शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपाध्यक्षपदी जयेश चिंचळकर, कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक सुनील बांदेकर, सचिवपदी मिथुन बांबुळकर, सल्लागारपदी भाजप युवा मोर्चा कुडाळ तालुकाध्यक्ष रुपेश कानडे व अॅड. राजीव कुडाळकर यांची निवड करण्यात आली. सहसचिव समीर कदम, खजिनदार दिनेश पाटकर, सहखजिनदार रघुनाथ तेंडोलकर, संघटक सचिव संतोष पालव, महिला संघटक सोनाली तेरसे, प्रसिद्धी सचिव शंकर बांदेकर, सदस्यपदी विनायक प्रभू, विजय म्हाडगूत, नागेश चव्हाण तसेच विभागीय कार्यकारिणी सदस्यपदी प्रशांत गावडे, संजय वरक, तुषार गवंडे यांची निवड करण्यात आली.
.................
swt162.jpg
77873
तेर्सेबांबर्डे ः तेर्सेबांबर्डे उपसरपंचपदी निवड झालेल्या धनश्री गवस यांचे अभिनंदन करताना संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे आदी.
तेर्सेबांबर्डेचे उपसरपंच हळदणकरांचा सत्कार
कुडाळ ः तेर्सेबांबर्डे गावातील उपसरपंचपदी असलेल्या रोहिणी हळदणकर यांचा एक वर्षाचा कार्यकाळ समाप्त झाल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी धनश्री गवस यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केल्याची घोषणा प्रभारी ग्रामसेविक अनवी शिरोडकर यांनी केली. गवस यांची बिनविरोध निवड झाल्याने भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, सरपंच रामचंद्र परब, सदस्य अजय डिचोलकर, संतोष डिचोलकर, गुणाजी जाधव, महेंद्र मेस्त्री, प्रणाली साटेलकर, रोहिणी हळदणकर, माधवी कानडे, सुनील बांदेकर, प्रकाश साटेलकर, नाथा गवस आदी उपस्थित होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.