सिंधुदुर्गात प्रत्येकी २ टनाने मत्स्योत्पादनात वाढ
रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मत्स्योत्पादनात वाढ
राज्यात २९ हजार टन उत्पादन ; मत्स्य व्यावसायिकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ :राज्यातील मत्स्योत्पादनात २९ हजार १८४ टन वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये राज्याचे ४ लाख ३४ हजार ५७५ टन होते. २०२४-२५ मध्ये ते वाढून ४ लाख ६३ हजार ७५८ टनवर पोहोचले आहे. गेल्या मासेमारी हंगामात मत्स्योत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आली होत; मात्र या हंगामात मत्स्योत्पादनात पुन्हा वाढ झाल्याने मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला. रत्नागिरी ६९ हजाराहून ७१ हजार, सिंधुदुर्ग, रायगड प्रत्येकी ३३ हजाराहून ३५ हजार असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुमारे १ ते २ टनाने मत्स्योत्पादनामध्ये वाढ झाली आहे.
गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच सर्वाधिक मत्स्योत्पादनाची नोंद यावर्षी झाली आहे. परप्रांतीय मासेमारी बोटींना राज्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी रोखण्यात आलेले यश, पर्ससीन आणि एलईडी मासेमारी रोखण्यात यश, अवैध मासेमारीवर ड्रोनने लक्ष ठेवले जात आहे. याचा परिणाम अवैध मासेमारी कमी होण्यावर झाला आहे तसेच हवामानाने दिलेली साथ मच्छीमारांच्या पथ्थ्यावर पडली आहे. राज्यातील मत्स्य उत्पादनवाढीचे प्रमाण ६.२९ टक्के आहे. महत्वाची बाब म्हणजे कोकण किनारपट्टीवरील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोकणातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३-३४ मध्ये ठाणे जिल्ह्यात २६ हजार ५७ टन उत्पादन नोंदवले गेले होते. त्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ठाण्यात ५४ हजार ४५७ टन मत्स्योत्पादन झाले आहे तर पालघर, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मत्स्योत्पादन साधारणपणे मागील हंगामाच्या तुलनेत १ ते २ हजार टनाची वाढ झाली आहे. गेल्या हंगामातील हवामानातील बदलांचा फटका मासेमारी बसला होता; मात्र यावर्षीच्या हंगामात हवामानाची साथ मिळाल्याने मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला.
जिल्हानिहाय मत्स्योत्पादन
पालघर - ३१ हजार १८१ टन
ठाणे - ५४ हजार ४५७ टन
मुंबई उपनगर - ७५ हजार २५४ टन
बृहन्मुंबई - १ लाख ७३ हजार ९१ टन
रायगड - ३५ हजार २७ टन
रत्नागिरी - ७१ हजार ३०३ टन
सिंधुदुर्ग - २३ हजार ४४५ टन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.