राजापूर-राजापुरातील सहा गट, आठ गणांच्या नावात बदल
राजापुरातील सहा गट, आठ गणांच्या नावात बदल
पुनर्रचनेमुळे नवी समीकरणे; २१ जुलैपर्यंत हरकतींसाठी मुदत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ः स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांमधील पुनर्रचनेत तालुक्यामध्ये पूर्वीप्रमाणे सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण कायम राहणार आहे. मात्र, या गट आणि गणांच्या नावांमध्ये बदल झाला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे आठ गण नव्या नावाने ओळखले जाणार आहेत. चार गण पूर्वीच्याच नावाने ओळखले जाणार आहेत.
गेल्या दोन दशकांपासून जिल्हा परिषदेचे ओणी, पाचल, केळवली, कोदवली, सागवे, देवाचे गोठणे असे सहा गट आणि ओणी, ओझर, पाचल, ताम्हाणे, केळवली, कोंड्येतर्फे सौंदळ, सागवे, अणसुरे, देवाचे गोठणे, साखरी नाटे, कोदवली, भालावली असे पंचायत समितीचे बारा गण आहेत. प्रारूप प्रभाग पुनर्रचनेमध्ये तालुक्यात एक जिल्हा परिषद गट वाढून सात गट, तर दोन पंचायत समिती गण वाढून चौदा गण अस्तित्वात आले होते. मात्र, त्यामध्ये फेरबदल होऊन नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग फेररचनेमध्ये पूर्वीप्रमाणे सहा गट आणि बारा गण राहणार आहेत. त्यामध्ये ताम्हाणे, केळवली, साखरी नाटे, अणसुरे हे चार गण जुन्याच नावाने राहणार असून उर्वरित सर्व गट आणि गण नव्या नावाने ओळखले जाणार आहेत. या नव्या प्रारूप प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत सूचना, हरकती नोंदविण्याची मुदत आहे.
चौकट ः
गणनिहाय समाविष्ट गावे
वडदहसोळ ः ओणी, मंदरूळ, चुनाकोळवण, कळसवली, वडवली कोंडिवळे, खरवते, वडदहसोळ, शिवणे बुद्रुक
रायपाटण ः ओझर, सौंदळ, कोळवण खडी, येळवण, ओशिवळे, वाटुळ, आडवली, रायपाटण, परटवली
तळवडे ः पाचल, कारवली, येरडव, करक, पांगरी खुर्द, झर्ये, तळवडे, परुळे, हरळ
ताम्हाणे ः ताम्हाणे, अजिवली, हातदे, मूर कोळंब, काजिर्डा, मिळंद, जवळेथर, तुळसवडे
केळवली ः केळवली, मोरोशी, तळगाव, ससाळे, हसोळतर्फे सौंदळ, मोसम, पांगरी बुद्रुक, दोनीवडे, आंगले, फुफेरे
जुवाठी ः कोंड्येतर्फे सौंदळ, प्रिंदावण, जुवाठी, डोंगर, विल्ये, महाळुंगे, पन्हळे तर्फे सौंदळ, वाल्ये, शेजवली, हातिवले, कणेरी, उन्हाळे
धोपेश्वर ः कोदवली, शेढे, कोंढे तर्फे राजापूर, शीळ, चिखलगाव, गोठणे दोनीवडे, धोपेश्वर, गोवळ
पेंडखले ः भालावली, भू, तेरवण, कोतापूर, खिणगिणी, दसुर, देवीहसोळ, पेंडखले
नाटे ः कशेळी, कोंडसर बुद्रुक, राजवाडी, वाडापेठ, मोगरे, नाटे, आंबोळगड
साखरी नाटे ः साखरी नाटे, देवाचे गोठणे, धाऊलवल्ली, शिवणेखुर्द, सोलगाव
अणसुरे ः अणुसरे, दळे, कुवेशी, पडवे, जैतापूर, मिठगवाणे, माडबन, साखर, निवेली, जुवे-जैतापूर
कातळी ः सागवे, नाणार, कुंभवडे, तारळ, उपळे
---------------
चौकट
नवीन जिल्हा परिषद गट
वडदहसोळ
तळवडे
जुवाठी
धोपेश्वर
साखरी नाटे
कातळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.