मडुरा, रोणापालमध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट
swt1621.jpg
77959
रोणापाल ः विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करताना मान्यवर.
मडुरा, रोणापालमध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट
बांदा, ता. १६ः शिरवल-कणकवली येथील प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने मडुरा व रोणापाल गावांतील प्राथमिक शाळा व अंगणवाडी विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पाच प्राथमिक शाळा व दोन्ही गावांतील अंगणवाडीतील सुमारे १०० हून अधिक विद्यार्थ्यांना रेनकोट वितरित करण्यात आले. यावेळी मडुरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, प्राणजीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर, सावंतवाडी प्रतिनिधी अंकित प्रभुआजगावकर, वेंगुर्ले प्रतिनिधी गितेश शेणई, सावंतवाडी प्रतिनिधी मोहन गवस, राजन गावडे, सीताराम नाईक, मडुरा ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, शिक्षक मंजिरी झेंडे, लक्ष्मण बरागडे, प्रिया माधव, साक्षी कोलते, श्वेता राऊळ, श्रीमती पाटोळे, शुभेच्छा गवस, अंगणवाडी सेविका पल्लवी परब, उज्ज्वला परब, पल्लवी गवंडी आदी उपस्थित होते. उपसरपंच बाळू गावडे यांनी संस्था संचालकांचे आभार मानले.
...............
swt1624.jpg
77960
बांदा ः नाबर प्रशालेत वृक्षारोपण करताना विद्यार्थी व शिक्षक.
बांदा नाबर शाळेच्या आवारात वृक्षारोपण
बांदा ः येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमधील एमएसएटी विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. या विभागातील गार्डनिंग व नर्सरी विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक म्हणून आवळा कलम, रक्तचंदन अशा झाडांचे वृक्षारोपण केले. या प्रशाळेतील विद्यार्थी दरवर्षी क्षेत्रभेट अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे नर्सरी व फळबाग लागवड यांची माहिती घेत असतात. आठवी ते दहावीमधील विद्यार्थी या विषयाचा अभ्यास करत आहेत. वृक्षारोपण करण्यासाठी लागणारे गांडुळ खत मुलांनी याच विभागातून प्रात्यक्षिकांतर्गत बनविले आहे. यावेळी समन्वयक राकेश परब, निदेशक भूषण सावंत, निदेशिका रिया देसाई, गायत्री देसाई उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.