होम मिनिस्टर स्पर्धेत १०० महिलांचा सहभाग

होम मिनिस्टर स्पर्धेत १०० महिलांचा सहभाग

Published on

- rat१७p२.jpg-
P२५N७८०६८
चिपळूण ः होम मिनिस्टर या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांकडून प्लास्टिक संकलन करताना समन्वयक.

होम मिनिस्टर स्पर्धेत १०० महिलांचा सहभाग
चिपळूण नगरपालिका, सह्याद्रीचा पुढाकार ; प्लास्टिकमुक्तीचा उद्देश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः चिपळूण नगरपालिका, सह्याद्री निसर्गमित्र व नाटक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ या विशेष स्पर्धेला शहरातील महिलांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमात शंभरहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आहे.
होम मिनिस्टर ही स्पर्धा १५ ऑगस्टपर्यंत असून, चिपळूण शहरातील सर्व महिलांना सहभागाची संधी खुली आहे. प्लास्टिकमुक्त चिपळूण घडवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये सहभागी महिलांनी आपल्या घरातून प्लास्टिक संकलन करायचे आहे. नगरपालिकेकडून घरपोच गाडी पाठवण्यात येणार आहे. संकलित केलेल्या प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना कुपन दिले जाणार आहेत. सर्वाधिक कुपन मिळवणाऱ्या महिलेला लकी ड्रॉमधून ‘चिपळूण होम मिनिस्टर’ हा मानाचा किताब बहाल करण्यात येईल. या उपक्रमात सहभागी प्रत्येक महिलेला गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून, लवकरच अंतिम फेरी होणार आहे. या वेळी विजेत्या महिलेला सोन्याची नथ व पैठणीसह विशेष सन्मान देण्यात येणार आहे. महिलांनी केवळ पर्यावरणपूरक कृतीत सहभाग न घेता सामाजिक नेतृत्वात पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक महिलांनी नावनोंदणी करावयाची आहे. या उपक्रमाची संकल्पना मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्गमित्रचे भाऊ काटदरे आणि नाटक कंपनीचे मानस संसारे यांची आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ च्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने महिलांचा हा सहभाग म्हणजे सामाजिक जाणीव आणि पर्यावरण सजगतेचे मूर्त रूप आहे. महिलांनी या संधीचा लाभ घेऊन पुढे यावे आणि ‘होम मिनिस्टर’ बनण्याची संधी साधावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com