''ऑपरेशन सिंदूर'' हे दहशतवादाला उत्तर
swt1715.jpg
78095
सावंतवाडीः सुभेदार मेजर संजय सावंत यांचा गुरुकुलतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित बबन साळगावकर,
उमाकांत वारंग, उमेश कोरगावकर, विलास जाधव, सीताराम गावडे आदी.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादाला उत्तर
सुभेदार मेजर संजय सावंतः सावंतवाडीत ‘गुरुकुल’तर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः कोकणवासीयांनी केलेला सत्कार हा माझा नसून वर्दी घातलेल्या प्रत्येक सैनिकाचा आहे. हा सन्मान माझ्या देशाचा आहे. देशासाठी लढावे, देशासाठी मरावे आणि सन्मानान जगावे, हेच माझे उद्दिष्ट आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी होण्याचे मुख्य कारण ‘एयर डिफेन्स’ होते. आमच्या देशवासीयांचे कुंकू पुसणाऱ्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ हे उत्तर होते, असे उद्गार सुभेदार मेजर संजय सावंत यांनी काढले. प्रत्येक मातेने जिजाऊ बनले पाहिजे, तरच शिवराय निर्माण होतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून गुरुकुल येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी करणारे सुभेदार मेजर सावंत हे तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र आहेत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे कौतुक केले होते. पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती. भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटनी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या नेतृत्वाखालील युनिटने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचे ४५ ड्रोन आणि २ क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशातच उद्ध्वस्त केले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या टीमचे कौतुक करीत शाबासकीची थाप दिली होती. आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व गुरुकुलच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला. देशासाठी लढलेल्या भूमिपुत्राचा सार्थ अभिमान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘सिंदूर ऑपरेशनवेळी सुभेदार मेजर यांना बोलावणे आले तेव्हा ते सावंतवाडीत होते. देशाने हाक देताच बोलवताच ते तातडीने निघाले. त्यावेळी माझा मित्र सहीसलामत परतूदे, अशी प्रार्थना केली होती अन् आज ते सुखरूप परतलेत. देशवासियांना अभिमान वाटावा, असे कार्य त्यांनी केले आहे.’’
यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, मनोज घाटकर, दीपक सावंत, रवी राऊळ, रत्नाकर माळी, उमेश खटावकर, दत्तू नार्वेकर, बंड्या तोरसकर, लवू पार्सेकर, मंगेश गोसावी, अजित सावंत, सत्यवान साईल आदी उपस्थित होते.
चौकट
मराठी माणसाच्या रक्तातच स्वाभिमान
सुभेदार मेजर सावंत म्हणाले, ‘‘माझे यापूर्वीही अनेक सत्कार झाले; मात्र जन्मभूमीत झालेला सन्मान माझ्यासाठी विशेष आहे. मी आरपीडीत शिकलो. वासुदेव गोसावी, व्ही. बी. नाईक हे माझे गुरुवर्य आहेत. माझे वडील, भाऊ सैनिक आहेत. आमची भूमी शौर्यभूमी असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची ही भूमी आहे. त्यामुळे स्वाभिमान हा येथील मराठीमाणसाच्या रक्तातच भिनला आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.