कुडाळात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
swt172.jpg
78097
कुडाळः गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटन करताना नंदकुमार राणे. बाजूला शशांक आटक, सचिन मदने, श्री. जांभवडेकर, नरेश खरात आदी. (छायाचित्रः अजय सावंत)
कुडाळात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
शिक्षक समितीचा पुढाकारः सेवानिवृत्त शिक्षकांचाही सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्यावतीने नंदकुमार राणे यांना सेवानिवृत्तीपर शुभेच्छा, सेवानिवृत्त शिक्षक सत्कार, दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा येथील मराठा समाज सभागृहात तालुकाध्यक्ष शशांक आटक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, सत्कारमूर्ती नंदकुमार राणे, नम्रता राणे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, शिक्षक पतपेढी माजी अध्यक्ष दिनकर तळवणेकर, शिक्षक पतपेढी माजी अध्यक्ष विजय सावंत, शिक्षक नेते प्रसाद वारंग, तालुका सरचिटणीस महेश गावडे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा संजना पेडणेकर, सरचिटणीस गौरवी बांबर्डेकर, शमिका आंगणे, नरेश खरात, आप्पा सावंत, नरेंद्र बावलेकर, शिवराम तावडे, बाबाजी भोई, संजय घाटकर, संजना राऊळ, सानिका मदने, भार्गवी कापडी, संजय गवस, संतोष तेरसे, धोंडी मसूरकर, सुधीर सावंत, अनंत राणे, बाळकृष्ण मर्गज, चंद्रकांत मळगावकर, रामचंद्र नाईक, राजकुमार घावनळकर, मनोज खोचरे, राजू नाईक, नारायण गावडे आदी उपस्थित होते.
माजी जिल्हाध्यक्ष व कुडाळ तालुका सरचिटणीस म्हूणन सलग सहा वर्षे काम केलेले नंदकुमार राणे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन तालुका शाखेतर्फे सपत्निक सत्कार तालुकाध्यक्ष आटक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झालेले उपक्रमशील शिक्षक सुवर्णा केणी,को मल तांबे, प्राची आंगणे, प्रफुल्लता धुरी, अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
दहावी, बारावी परीक्षा, शिष्यवृत्ती व इतर परीक्षांमध्ये सुयश संपादन केलेल्या शिक्षक पाल्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. जिल्हाध्यक्ष गवस, चंद्रकांत अणावकर, विजय सावंत, सचिन मदने यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांमधून भावेश तौर व मनस्वी मर्गज यांनी मनोगत व्यक्त केले. नंदकुमार राणे यांनी शिक्षक समितीचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक सरचिटणीस गावडे यांनी केले. सूत्रसंचालन शैलेंद्र न्हावेलकर यांनी केले. आभार स्वामी सावंत यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.