मा. आमदार दिपक केसरकर वाढदिवस विशेष

मा. आमदार दिपक केसरकर वाढदिवस विशेष

Published on

पुरवणी डोकेः मा. आमदार दिपक केसरकर वाढदिवस विशेष

swt177.jpg व swt178.jpg
78102, 78103
दीपक केसरकर
swt179.jpg
78104
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत दीपक केसरकर.
swt1710.jpg
78093
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत दीपक केसरकर.
swt1711.jpg
78094
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना दीपक केसरकर.
swt1712.jpg
78105
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत दीपक केसरकर.

संयमी, अभ्यासू नेतृत्व

लीड
राजकारणापेक्षा समाजकारणाला, समाजहिताला प्राधान्य देणारे सभ्य सुसंस्कृत व विनम्र स्वभावाचे नेतृत्व म्हणून आमदार दीपक केसरकर यांच्याकडे पाहिले जाते. लोकांच्या मनातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री म्हणून जबाबदारी असताना त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयातून त्यांचा अभ्यासूपणा ठळकपणे उमठवितो. म्हणूनच आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा या व्यक्तिमत्त्वाचा आज (ता.१८) वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला प्रकाशझोत...
---------------
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दीपक भाई केसरकर हे एक तळपते व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे ते कार्यक्षम आमदार आहेत. त्यांच्या राजकीय प्रवास, त्यांची दूरदृष्टी आणि कोकणच्या विकासासाठी त्यांचे अविचल समर्पण खरोखरच वाखण्याजोगे आहे. राजकारणामध्ये काम करत असताना त्यांनी नगराध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री अशी मजल मारली आहे. कोणत्याही सत्ता स्थानावर असताना आपल्या पदाचा उपयोग सार्वजनिक विकास साधण्यासाठी केला पाहिजे, हे ब्रीद केसरकर यांनी आयुष्यभर जपले आहे आणि याच विचाराच्या जोरावर त्यांनी समाजात केलेले काम पाहता त्यांना जनतेने भरभरून मतदान करून चौथ्यांदा विधानसभेवर पाठवले. केसरकर यांनी आजपर्यंत वित्त राज्यमंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे.
साधारण साडेतीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अचानक घडलेला बदल पाहता केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाऊन महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारमध्ये शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. मिळालेल्या संधीचे सोने करण्याच्या दृष्टीने केसरकर यांनी शिक्षण खात्यात लक्ष घालून अमुलाग्र बदल केले. अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. शालेय मंत्री असताना त्यांनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय सर्वत्र कौतुकास पात्र ठरला तो म्हणजे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकातच वह्यांची पाने समाविष्ट करणे. त्यांचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. मोफत गणवेश योजना, विद्यार्थ्यांना बूट पाय मोजे, पोषण आहार, शाळेत परसबागा, आजी-आजोबा दिवस, स्वच्छ मॉनिटर, शिष्यवृत्तीत वाढ, दत्तक शाळा योजना, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, शिक्षण सेवक मानधनात भरीव वाढ, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मानधनात भरघोस वाढ, शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता, माजी सैनिक भरती, केंद्रप्रमुख भरती अशा असंख्य निर्णयातून त्यांनी अडीच वर्षांत आपल्या खात्याला योग्य न्याय देतांना एक आदर्श शिक्षण मंत्री म्हणूनही नाव कमावले.
केसरकर यांनी समाजातील दीनदुबळे, मध्यमवर्गीय, अबालबुद्ध यांची सुखदुःखे, संकटे आपलीच मानली. त्यांच्या सुखदुःखात समरस होत त्यांनी समाजकारणाचा वसा घेतला. त्यांनी गोरगरीब जनतेच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी राजकारण केले. तळागाळातील सर्वसामान्य माणूस हा नेहमीच त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. जिल्ह्यातील महिला, युवक, कामगार वर्ग, मच्छीमार अशा सर्वसामान्य जनतेची आर्थिक उन्नती होऊन त्यांची कुटुंबे सुखी करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध प्रकल्प राबविले. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात अनेक माध्यमातून निधी उपलब्ध करून जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.
कोकणाबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची धमक त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली आहे. विकास प्रक्रियेत लोकांचा सहभाग असायला हवा, हे ते नेहमीच मानतात. सिंधुदुर्गातील नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता येथे पर्यावरणपूरक उद्योग उभा राहायला हवेत, ही त्यांची दूरदृष्टी आहे. प्रामुख्याने शेती, फलोत्पादन व मासेमारीवर अवलंबून असलेल्या कोकण व जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी जे बीज रोवले आहे, त्याची गोड फळे भविष्यात कोकणवासीयांना चाखायला मिळतील यात तीळमात्र शंका नाही. यापुढे आपले जीवन कोकणच्या विकासासाठी समर्पित करण्याचे उद्दिष्ट केसरकर यांनी ठेवले आहे. आपल्या उर्वरित जीवनात कोकणच्या आणि विशेषतः सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात गावागावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेण्याचा आणि प्रत्येक तालुक्यात शासकीय कार्यालयात बसून आठवड्यातून एकदा जनतेला भेटून त्यांच्या समस्या दूर करण्याचा त्यांचा निर्धार आहे. हे त्यांचे कोकणावरील निस्सीम प्रेम आणि कोकणच्या विकासाची त्यांची तळमळ दर्शवते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष सहकार्य तसेच कुडाळचे आमदार निलेश राणे यांची साथ त्यांना असल्यामुळे ते सावंतवाडी मतदारसंघासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विकासासाठी नक्कीच मोलाची कामगिरी करतील यात शंका नाही.

चौकट
सिंधुदुर्गातील अनेक प्रकल्पांसाठी प्रयत्न
आंबोली येथील पर्यटन, टाटा समूहाचे पंचतारांकित हॉटेल, पाणबुडी प्रकल्प, अम्युझमेंट पार्क, सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असे अनेक प्रकल्प त्यांना साकारायचे आहेत. त्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com