वांझोळ येथे वृक्षलागवड

वांझोळ येथे वृक्षलागवड

Published on

वांझोळे येथे
वृक्ष लागवड
संगमेश्वर ः वांझोळे येथील केदारलिंग ग्रामस्थ मंडळातर्फे शिवाजी माध्यमिक विद्यालयात वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक संजय कोरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी पर्यावरणाचे महत्व, वृक्ष लागवडीची गरज आणि भविष्यातील पिढ्यांसाठी वृक्षसंवर्धनाचे योगदान या विषयी माहिती दिली. या वेळी माळी, गोपणे, बाळ पंदेरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या परिसरात विविध प्रकारची फळझाडे व छायादायक वृक्ष लावण्यात आले. विद्यार्थ्यांनी झाडांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.

नाभिक पतसंस्थेची
२८ला वार्षिक सभा
खेड : भरणे येथील श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा २८ जुलैला सकाळी १०.३० वाजता पतसंस्थेच्या सभागृहात पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करणे, संचालक मंडळाने मंजूर केलेली नफा वाटणी व लाभांश यांना मंजुरी देणे, मंजूर अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, लेखा परीक्षकाची नेमणूक करणे, २०२५- २६ आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे यांसह अन्य विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

समरीन बुरोंडकर
बीच कबड्डी संघात
खेड : भरणे-बाईतवाडी येथील अनिकेत स्पोर्टस् क्लबची अष्टपैलू खेळाडू समरीन बुरोंडकरची भारतीय महिला बीच कबड्डी संघाच्या संभाव्य महिला संघात निवड झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कबड्डीत चमक दाखवणाऱ्या बुरोंडकरने तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करत पदके प्राप्त केली आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपास आलेल्या समरीनने अनिकेत स्पोर्टस् क्लबलाही विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारतीय महिला बीच कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com