चिपळूणातून एसटीचे आरक्षण

चिपळूणातून एसटीचे आरक्षण

Published on

चिपळुणातून
एसटीचे आरक्षण
चिपळूण ः गणेशोत्सव आटोपल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी चिपळूण आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्याच्या संगणकीय आरक्षणाला ११ जुलैपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी दिली. चिपळूण आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, भाईंदर, विठ्ठलवाडी, पुणे, बारामती या मार्गावर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी नेहमीच्या बसव्यतिरिक्त जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एसटीच्या प्रवासामध्ये ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, ६५ वर्षावरील व महिला प्रवाशांना ५० टक्के दरात प्रवास या सुविधा उपलब्ध असून, मागणीनुसार तालुक्यातील विविध गावांतून ४२ प्रवासी उपलब्ध झाल्यास ग्रुप बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चिपळूण आगारात यावर्षी पाच नवीन बस उपलब्ध झाले आहेत तसेच जुन्या बसेस चांगल्या स्थितीत आहेत. त्या प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जाणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख चव्हाण यांनी केले आहे.

रानभाज्यांचे
पोफळीत प्रदर्शन
चिपळूण ः विद्यार्थ्यांना आहारात पालेभाज्या व रानभाज्या यांचे महत्त्व समजण्यासाठी पोफळी येथील प्राथमिक शाळेच्या परिसरातील रानभाज्या व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन विद्यार्थी सहभागातून भरवण्यात आले होते. यासाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी टाकळा, भारंगी, अळू, कुर्डू, पेवा, फोडशी, कवळा, आकुर, कुड्याच्या शेंगा, सुरण, काटल ,दिंडी, पथरी, आरवी, टाकळा, भारंगीसारख्या साधारण ३५ प्रकारच्या रानभाज्या, तुळस, अडुळसा, दुर्वा, कोरफड, कडुनिंब अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणल्या होत्या. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तसेच प्राथमिक शाळा पोफळीचे शालेय समिती सदस्य अभय चितळे यांनी या प्रदर्शनास भेट दिली. मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका शिवानी शिंदे, प्रतिभा धुमाळ, साधना गायकवाड, रिता चव्हाण, अक्षता साळवी, सरिता मानकर यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com