रत्नागिरी -जिंदलला दिलेला तो ना-हरकत दाखला बोगस
जिंदलला दिलेला ‘तो’ नाहरकत दाखला बनावट
नांदिवडे ग्रामपंचायतीचे निवेदन ः १९ वर्षांपूर्वीची कुठलीही नोंद दप्तरी नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : नांदिवडेचे ग्रामस्थ जिंदल कंपनीच्या गॅस टर्मिनलविरोधात अनेक दिवस लढा देत आहेत. गेल्या महिन्यात जयगड येथे झालेल्या बैठकीत जिंदल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नाहरकत दाखला मिळाल्याचे सांगितले होते; पण त्या नाहरकत दाखल्याची चौकशी केली असता त्या दाखल्यावर जावक क्रमांक नाही, ठरावाची तारीख नाही आणि त्याचा दफ्तरात कुठेही नोंद नसल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील यांनी केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देत या कथित ना हरकत दाखल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
अॅड. स्वप्नील पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ९ जून २००६चा कथित नाहरकत दाखला जेएसडब्ल्यू एनर्जी आणि जेएसडब्ल्यू ब्राह्मी बंदर यांच्यासाठी दाखवण्यात येत आहे; मात्र या दाखल्याची कोणतीही अधिकृत नोंद सापडली नसल्याची तक्रार अॅड. पाटील यांनी केली आहे. हा दाखला बनावट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. संबंधित नाहरकत दाखल्याची सखोल चौकशी करा, अशी मागणी यावेळी केली आहे. हे प्रमाणपत्र खोटे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, गॅस टर्मिनल तत्काळ स्थलांतरित करावे, जिंदल कंपनीने स्थानिक ग्रामस्थांचे शेती, मच्छीमारी आणि फळबाग यांची नुकसानभरपाई द्यावी. चौकशीचा संपूर्ण अहवाल १५ दिवसांत आम्हाला द्यावा, अशी मागणी अॅड. स्वप्नील पाटील यांनी केली आहे.
२००६ला दाखला
दिल्याचे कंपनीचे म्हणणे
ग्रुप ग्रामपंचायत नांदिवडेने ९ जून २००६ला हा ना हरकत दाखला दिल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये मे जेएसडब्ल्यू एनर्जी (रत्नागिरी) (औष्णिक वीजनिर्मिती) जयगड व मे जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड लॉजिस्टिक लि. (बारमाही बंदर) धामणखोल जयगड या कंपनीला वीजनिर्मिती प्रकल्प आणि बारमाही बंदर सुविधा उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कसलीही हरकत नाही करिता ना हरकत दाखला दिला आहे, असा दाखला दिल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु १९ वर्षांपूर्वी दिलेला हा दाखला बनावट आणि खोटा असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.