सुवर्णदुर्ग गौरवयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
-rat१७p५.jpg-
२५N७८११०
दापोली ः ज्ञानदीप संस्थेच्या गौरवयात्रेमध्ये सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
--------
दापोलीत सुवर्णदुर्ग गौरवयात्रेतून आनंदोत्सव
विद्यार्थी, नागरिकांचा सहभाग ; वेषभूषा ठरली आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १७ : दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा युनेस्को जागतिक वारसायादीतील समावेश साजरा करण्यासाठी ज्ञानदीप संस्था व सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली गौरवयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत प्रत्येकाने या सोहळ्यात आपुलकीने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता झाली. सुरुवातीला किल्ल्याच्या इतिहासाच्या आठवणी व्याख्यानातून जाग्या केल्या. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीसह रॅली काढली तर लेझीम पथक, वाद्यवृंद यामुळे वातावरण दुमदुमले. विद्यार्थ्यांनी खास आकर्षण ठरवले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे यांची केलेली वेशभूषा. त्यांच्या हातातील काल्पनिक तलवारी, भाले, शस्त्रांची सजावट यामुळे इतिहास जिवंत झाला होता. रॅलीदरम्यान शिवकालीन जयघोष, मावळ्यांची शौर्यगाथा यांची प्रत्यक्ष अनुभूतीच दापोलीकरांना मिळाली.
या आनंदोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, इतिहासावर व्याख्यान यासोबतच विद्यार्थ्यांच्या उत्साहाने दापोलीच्या रस्त्यांवर वारसा अभिमानाची लाट उसळली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानदीप दापोलीतर्फे आयोजित या गौरवयात्रा व गौरव मशालीचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदीप परिवाराने विशेष मेहनत घेतली. संपूर्ण दापोलीने हा क्षण इतिहासाचा उत्सव म्हणून साजरा केला.
कोट
हा क्षण दापोलीच्या अभिमानाचा असून, नव्या पिढीला आपल्या वारशाची जाणीव व्हावी यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत तसेच सुवर्णदुर्गचा सन्मान हा आपला सन्मान आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली वेशभूषा ही इतिहासाशी जोडणारा अनमोल प्रयत्न होता.
- सरोजताई मेहता, अध्यक्षा, ज्ञानदीप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.