साखरपा -पुर्येतर्फे देवळे शाळेत साहित्य जागर
rat18p9.jpg
78288
साखरपा : साहित्यिक अशोक लोटणकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी.
पुर्येतर्फे देवळे शाळेत साहित्य जागर
साखरपा, ता. १८ : येथील पुर्येतर्फे देवळे या शाळेत आयोजित साहित्यजागर कार्यक्रमावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
पुर्येतर्फे देवळे ही शाळा दुर्गम वस्तीतील शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत लेखक कवी अशोक लोटणकर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या कवितांच्या पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. धमाल गम्मत, आभाळाचे घर तसेच शब्दांचे फटाके ही पुस्तके कवी लोटणकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी मुख्याध्यापिका अनघा बोंद्रे, शिक्षिका स्मिता पाटील, नीता मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अक्षरा भोवड, शिक्षणतज्ञ वसंत भोवड, कोकणस्थ उत्कर्ष फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ठाकर हे उपस्थित होते. शिक्षणतज्ज्ञ भोवड यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांबाबत माहिती दिली. मुख्याध्यापिका बोंद्रे यांनी वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या प्रसंगी कवी अशोक लोटणकर यांनी स्वत:च्या पाऊस, पावसाच्या धारा आणि थेंब...थेंब या कवितांचे वाचन केले.