गोळवण ‘पोईप’मध्ये; डिकवल, कुमामे ‘सुकळवाड’मध्ये

गोळवण ‘पोईप’मध्ये; डिकवल, कुमामे ‘सुकळवाड’मध्ये

Published on

लोगो ः जिल्हा परिषद, पंचायत समिती आराखडा
------

गोळवण ‘पोईप’मध्ये; डिकवल, कुमामे ‘सुकळवाड’मध्ये

पारुप आराखडा जाहीर; मालवणमध्ये हरकतींची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनांचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यानुसार मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण यांच्यामध्ये फारसा बदल झाला नाही. मात्र, मागील आराखड्यामध्ये वायरी भूतनाथ मतदारसंघातील आंबडोस हे गाव पोईप गटात, तर आंबेरी हे गाव पेंडूर गटात समाविष्ट केले होते. ही दोन्ही गावे पूर्वीच्या जिल्हा मतदारसंघात समाविष्ट व्हावीत, अशी स्थानिकांची मागणी होती. त्यामुळे नवीन प्रारूप आराखड्यामध्ये हा बदल करण्याची मागणी हरकतीद्वारे घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच पोईप गणातील गोळवण ग्रामपंचायतीचे गोळवण गाव पोईप गणाला, तर डिकवल व कुमामे ही दोन गावे सुकळवाड गणात समाविष्ट केली आहेत. त्यामुळे याबाबतही हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे ६ गट, तर १२ गण यांचा समावेश आहे. यात कोणताही बदल किंवा वाढ झाली नाही. आडवली मालडी गणात श्रावण, आडवली मालडी, रामगड, मठबुद्रक, बुधवळे, कुडोपी, निरोम, गोठणे, किर्लोस या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शिरवंडे गणात हिवाळे, शिरवंडे, असगणी, राठिवडे, असरोंडी, ओवळीये या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. चिंदर गणात त्रिंबक, बांदिवडे बुद्रुक, बांदिवडे खुर्द, पळसंब, आचरा गणात आचरा, तोंडवळी, वायंगणी, कोळंब गणात कोळंब, कांदळगाव, रेवंडी, मिर्याबांदा, हडी, मसुरे मर्डे गणात मर्डे, देऊळवाडा, बिळवस, वेरळ, मालोंड व महान, पोईप गणात पोईप, मसदे चुनवरे, वडाचापाट, माळगाव, गोळवण, चाफेखोल, कुणकवळे, आंबडोस, सुकळवाड गणात सुकळवाड, नांदोस, तिरवडे, हेदूळ, खोटले, वायंगवडे, गोळवण, वराड गणात वराड, वरची गुरामवाडी, तळगाव, पेंडूर गणात पेंडूर खरारे, धामापूर, काळसे, साळेल, आंबेरी, कुंभारमाठ गणात चौके, देवली, कातवड, घुमडे, आनंदव्हाळ, नांदरुख, कुंभारमाठ, वायरी भूतनाथ गणात देवबाग, तारकर्ली, काळेथर, वायरी भूतनाथ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आडवली मालडी गटात १४ ग्रामपंचायती व २० गावे, आचरा गटात ८ ग्रामपंचायती व ३० गावे, मसुरे मर्डे गटात ११ ग्रामपंचायती व ३० गावे, सुकळवाड गटात १४ ग्रामपंचायती, तर १९ गावे, पेंडूर गटात ८ ग्रामपंचायती व २३ गावे, वायरी भूतनाथ गटात १० ग्रामपंचायती व १३ गावांचा समावेश आहे.
...........................
घडामोडीनंतर समीकरणे ठरणार
सद्यस्थितीत प्रारूप आराखडा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे ज्यावेळी गट आणि गण यांचे आरक्षण जाहीर होईल, त्यानुसार विविध पक्षांचे उमेदवार निश्चित होणार आहेत. मागील निवडणुकीत पूर्वीचा शिवसेना आणि सद्यस्थितीत ठाकरे शिवसेना गटाचे केवळ वायरी भूतनाथ मतदारसंघावर वर्चस्व होते, तर अन्य मतदारसंघांवर राणे समर्थकांचे वर्चस्व होते. सध्या शिंदे शिवसेनेत राणे समर्थकांचे अनेक लोकप्रतिनिधी सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. काही राणे समर्थक भाजपसोबतच आहेत. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच या दोन्ही पक्षांकडून उमेदवार निश्चित केले जातील, असे चित्र आहे. ठाकरे शिवसेनेला सर्वच मतदारसंघांमध्ये नवे चेहरे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
.............................
२०११ च्या जनगणनेनुसार गटनिहाय लोकसंख्या
आडवली मालडी - १४८७४
आचरा - १५६०४
मसुरे मर्डे - १५१५८
सुकळवाड - १५९७८
पेंडूर - १५६५५
वायरी भूतनाथ - १५८९०
एकूण - ९३१५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com